महाराष्ट्र
Trending

उध्दव ठाकरेंवर शरद पवारांनी जादूटोणा केल्याचे वक्तव्य करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा आधी तपास करून घ्यावा: महेश तपासे

Story Highlights
  • महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा कुठल्या सरकारने आणला याचा विसर बावनकुळे यांना पडला असावा - तपासे
  • २९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा तुमचे सरकार पायउतार होणार हे निश्चित आहे. त्यानंतर तुम्हाला जादूटोणा जे काही करायचं ते करा असेही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना सुनावले आहे.

मुंबई दि. ११ नोव्हेंबर – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा मग बोलावे अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

उध्दव ठाकरे यांच्यावर शरद पवार यांनी जादूटोणा केल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते त्या वक्तव्याचा महेश तपासे यांनी समाचार घेतला आहे.

जादूटोणा, भोंदूबाबा हे शब्द सभ्य संस्कृतीतील नाहीत. राजकारण करायचं असेल तर मुद्दयावर राजकारण करा असा इशाराही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना दिला आहे.

महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा कुठल्या सरकारने आणला याचा विसर बावनकुळे यांना पडला असावा असा टोला लगावतानाच शरद पवार यांची यांची पकड महाराष्ट्रावर आहे. तुमच्यासारख्या जातीयवादी पक्षाच्या तावडीतून शिवसेनेला मुक्त करून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले ही किमया पवार यांची आहे.

त्यामुळे २९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा तुमचे सरकार पायउतार होणार हे निश्चित आहे. त्यानंतर तुम्हाला जादूटोणा जे काही करायचं ते करा असेही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना सुनावले आहे.

Back to top button
error: Content is protected !!