महाराष्ट्र

वीज मीटरमध्ये छेडछाड करून देणाऱ्यावर गुन्हा दाखल

जिंतूर शहरातील अनेक ग्राहकांचे पीतळ उघडे होण्याची शक्यता

मीटरची गती कमी करून वीज वापरलेल्या हॉटेल व्यावसायिकाकडून 47 हजार दंडाची रक्कम वसूल

जिंतूर,दि.16 सप्टेंबर 2022 : वीजमीटर मध्ये छेडछाड करून वीज वापरणाऱ्या व्यावसायिक वीजग्राहकांचे मीटर तपासणीत श्हरातील एका हॉटेल व्यावसायिकाचे मीटर मध्ये छेडछाड करून गती कमी केल्याचे लक्षात आले. याबाबत सखोल चौकशी केली असता युनूस शेख याचे नाव पुढे आले. यावरून सदरील व्यक्ती विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मीटर मध्ये छेडछाड करून घेतलेल्या वीजग्राहकांचे पीतळ उघडे होणार आहे.

 जिंतूर शहरामध्ये मोठ्याप्रमाणात वीजबिल थकबाकी असल्यामूळे प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद यांच्या कार्यालयाच्या पथकाद्वारे जिंतूर शहरामधील एका हॉटेल व्यावसायिकाच्या मीटरवर विजेची कमी नोंद होत असल्यामुळे या ग्राहकाचे मीटर टेस्टिंगला पाठविण्यात आले होते,

ज्यात ग्राहकाच्या मीटरमध्ये वीज चोरी करण्याच्या उद्देशाने छेडछाड करण्यात आलेली असल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्राहकाला विद्युत कायदा2003 कलम 135 नुसार दंडाचे बिल देऊन ग्राहकांकडून एकूण 3525 रीडिंगच्या नुकसानीचे रु.47 हजार 130 एवढी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली आहे.

मीटरमध्ये छेडछाड करण्याच्या कारवाया याआधीही जिंतूर शहरामध्ये करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये केवळ ग्राहकाला दंड करण्यात येतो परंतु जो व्यक्ती मीटरमध्ये प्रत्यक्षात छेडछाड करून देतो त्यापर्यंत पोहोचता येते नव्हते.

त्यामुळे ग्राहकांना आमिष दाखवून ग्राहकांची आणि पर्यायाने महावितरणची फसवणूक होत होती. यामुळे या घटनेमध्ये उपविभागीय अभियंता श्री राजेश मेश्राम यांनी  सखोल चौकशी केली असता यामध्ये नामे युनूस शेख या व्यक्तीचे नाव पुढे आले. या व्यक्तीने ग्राहकास कमी बिल येईल असे मीटर देतो असे सांगून त्याच मीटरमध्ये छेडछाड करून बसवून दिले

ज्यामुळे ग्राहकाचे वीजबिल कमी नोंद होत गेले. यामुळे युनूस शेख यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५, १३८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अनेक वीजग्राहकांना मीटर मध्ये छेडछाड केल्याचे प्रथम दर्शनी चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे ग्राहकांचे मीटर तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!