महाराष्ट्र
Trending

औरंगाबाद मनपाचा कर्मचारी लाच घेताना अटकेत, दोन दिवसांची हजेरी लावण्यासाठी सहा हजार घेतले ! दांड्या मारून हजेरी लावण्यासाठी चीरीमिरी घेणाऱ्यांचे धाबे दणाणले !!

Story Highlights
  • लाचेची रक्कम रुपये 6000/- साईबाबा मंदिर जवळ, विश्वासनगर, लेबर कॉलनी जवळ औरंगाबाद येथे स्वीकारली.

औरंगाबाद, दि. 20 – औरंगाबाद महानगरपालिकेच्या सफाई जवानास सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. तक्रारदार यांच्या पत्नीची दोन दिवसांची गैरहजेरी सफाई निरीक्षक यांना न पाठविणसाठी व मागील हजेऱ्या लावण्याचा मोबदला म्हणून त्यांनी ही लाच स्वीकारली. दरम्यान, या कारवाईमुळे दांड्या मारून हजेरी लावण्यासाठी चीरीमिरी घेणाऱ्यांचे धाबे दणाणले.

इस्माइल शमशु पठाण (वय 49 वर्षे, पद- सफाई जवान (तात्पुरते मुकादम), झोन क्रं.04 महानगरपालिका औरंगाबाद)  (रा. इब्राहीमशाह कॉलनी, प्लॉटनं 03, पहाडसिंगपुरा औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.  याप्रकरणी पोलीस ठाणे सिटीचौक औरंगाबाद शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

यातील तक्रारदार यांची पत्नी झोन क्र. 04 म.न.पा. औरंगाबाद येथे सफाई कामगार म्हणून नोकरीस असून त्यांची दोन दिवसांची गैरहजेरी पडली आहे. सदर गैरहजेरी सफाई निरीक्षक यांना न पाठविण्यासाठी व मागील हजेऱ्या लावण्यासाठी इस्माईल पठाण यांनी तक्रारदार यांना 6000/- रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद या कार्यालयात तक्रार दिली. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून केलेल्या पडताळणी दरम्यान इस्माईल पठाण यांनी तक्रारदार यांना रुपये 6000/- लाचेची मागणी करून पंच साक्षीदारांसमक्ष स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद तर्फे दि. 20/10/2022 रोजी सापळा रचला असता इस्माईल पठाण यांनी पंच साक्षीदारा समक्ष ठरलेली लाचेची रक्कम रुपये 6000/- साईबाबा मंदिर जवळ, विश्वासनगर, लेबर कॉलनी जवळ औरंगाबाद येथे स्वीकारली. यानंतर लाचेच्या रक्कमेसह त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध पो. ठाणे सिटीचौक येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हनुमंत बारे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद यांनी तपास अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. या कारवाईमुळे मनपामध्ये लाच घेणार्या लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप अधिक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांनी केली आहे. त्यांना सदर कारवाई कामी पोना/ साईनाथ तोडकर पोअं/ विलास चव्हाण, केवलसिंग घुसिंगे चालक- चंद्रकांत शिंदे यांनी मदत केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधावा.

Back to top button
error: Content is protected !!