महाराष्ट्र
Trending

औरंगाबाद: रिक्षाचालकांत राडा, पॅसेंजर भरण्यावरून शिवाजीनगर चौकात बेल्टने मारहाण !

औरंगाबाद, दि. २९ – पॅसेंजर भरण्यावरून रिक्षाचालकांत राडा झाल्याची घटना औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर चौक परिसरात घडली. यावेळी एका रिक्षाचालकाने दुसर्याला बेल्टने मारहाण केली.

यासंदर्भात रईस गणी पठाण (वय-30 वर्षे, धंदा रिक्षाचालक रा. गांधेली झोपडपट्टी बीडबायपास रोड, डेअरी जवळ ता. जि. औरंगाबाद) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, सेव्हन हिल ते शिवाजीनगर औरंगाबाद या दरम्यान दरम्यान रिक्षा चालवत असतो.

दि. 28/11/2022 रोजी रोजी 09.30 वाजेच्या सुमारास रईस गणी पठाण याने त्याचा रिक्षा (क्र.MH-20EF-8942) प्रवासी भरण्याकरीता वाणी मंगल कार्यालय समोर, शिवाजी नगर रिक्षा स्टॅण्ड या ठिकाणी लावलेला होता.

रईस गणी पठाण याच्या सोबतच वाणी मंगल कार्यालय रिक्षा स्टँण्ड येथे शोएब शेख याने त्याच्याकडील रिक्षा (MH-20EF-2118) हा प्रवासी वाहतुकीकरीता लावलेला होता. शोएब खान याचे वडील गुड्डू शेख हे पण रिक्षा स्टॅण्डवर हजर होते. दि.-28/11/2022रोजी 09.30 वा. सुमारास रईस गणी पठाण यांनी वाणी मंगल कार्यालय रिक्षा स्टॅन्ड येथून एक प्रवासी रिक्षात घेतला.

याचा राग शोएब शेख यास आला. त्यामुळे शोएब शेख याने रईस गणी पठाण यास शिवीगाळ करून पॅसेंजर न भरण्या बाबत सांगितले. त्यानंतर त्याने रईस गणी पठाण यास लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास चालु केली. गुड्डू शेख याने पण मारहाण केली.

मारहाणी दरम्यान शोएब शेख याने त्याच्याकडील कमरी बेल्ट काढून मारहाण चालु केली. इतर दोन साथीदार बोलावुन घेतले. व त्यपैकी साहिल शेख याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. नंतर त्यांच्या मारहाणीत रईस गणी पठाण हे खाली पडले. दरम्यान, लोंकानी रईस गणी पठाण यास उठवून पोलीस स्टेशनला जाण्या बाबत सांगितले. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

तरी आज रोजी वैद्यकीय उपचार घेवुन नामे शोएब शेख, साहिल शेख, व गुड्ड शेख इतर एक यांनी संगनमताने मला लाकडी दांडा, बेल्ट व लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली आहे. तरी संबंधितांवर योग्य ती कायदेशिर कार्यवाही होणेस विनंती आहे. म्हणुन गुन्हा दाखल

Back to top button
error: Content is protected !!