महाराष्ट्र
Trending

आमदार संजय शिरसाठ यांचे बॅनर लावत असताना दगडाने मारहाण ! हातावर चावा घेऊन चेहऱ्यावर ओरबाडले, शिवाजीनगर चौकातील घटना !!

औरंगाबाद, दि. २९ – आमदार संजय शिरसाठ यांचे बॅनर लावत असताना दगडाने मारहाण करून हातावर चावा घेतला. चेहऱ्यावर ओरबाडले. ही घटना आज सकाळी शिवाजीनगर चौकात घडली. मागील भांडणाची कुरापतीवरून हा प्रकार घडला.

यासंदर्भात सुरज भालचंद्र शिंदे (वय 27 वर्षे, रा. शिवाजीनगर) याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, अशोक वज्रे (रा. इंदिरानगर) यांच्याशी तोंडओळख असून गणपती उत्सवा दरम्यान स्टेजवर येण्यावरून सुरज भालचंद्र शिंदे व अशोक वज्रे यांच्यात तोंडी वाद झाला होता.

दिनांक 29/11/2022 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सुरज भालचंद्र शिंदे आमदार संजय शिरसाठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवाजीनगर चौकात त्यांना शुभेच्छा देणारा बॅनर लावत होता. बॅनर लावत असताना अशोक वज्रे मागून येवून त्याने सुरज भालचंद्र शिंदे  यास दगडाने मारहाण चालू केली.

त्यानंतर त्याने सुरज भालचंद्र शिंदे याच्या उजव्या हाताच्या तळव्यावर दातांनी चावा घेवून नखांनी चेह-यावर ओरडबाडले. याप्रकरणी सुरज भालचंद्र शिंदे याने दिलेल्या तक्रारीवरून जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Back to top button
error: Content is protected !!