महाराष्ट्र
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 45 अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्या !

औरंगाबाद, दि. 11 नोव्हेंबर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एकूण 45 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कुलगुरु प्रमोद येवले यांच्या निर्देशाने कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या स्वाक्षरीने या बदल्यांचा आदेश आज सायंकाळी काढण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठाने दिली.

यासंदर्भात विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अस्थापना विभागाच्या वतीने या बदल्यांचे आदेश आज सायंकाळी जारी करण्यात आले. या मध्ये वर्ग एकचे चार (उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव), वर्ग दोनचे ११ (प्रोग्रामर, कक्षाधिकारी), वर्ग तीनचे २५ व वर्ग चारचे पाच कर्मचारी अशा एकूण ४५ जणांचा समावेश आहे .

कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या आदेशाने या बदल्या करण्यात आल्या असून तात्काळ रुजू होण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या स्वाक्षरीने या बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

कोणत्याही परिस्थितीत बदली रद्द करण्यात येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. डॉ.भगवान साखळे यांनी कुलसचिव पदाची सूत्रे स्वीकारली याला आज एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे.

Back to top button
error: Content is protected !!