महाराष्ट्र
Trending

गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश

दहा कलमी कार्यक्रम राबवावा-आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना, अतिरिक्त लसीकरणही करणार

पुणेदि. 5 : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्‍यात यावाअसेही त्यांनी सांगितले.

            पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटेराज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

            बैठकीत डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितलं की, गोवरचा उद्रेक थांबविण्यासाठी सर्वप्रथम ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरविण्यात येण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यासाठी लागणारी यंत्रणालसीच्या मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय उद्रेक झालेल्या भागात अतिरिक्त डोस देखील नऊ महिने ते पाच वर्षांच्या बालकांना देण्यात यावे असे सांगितले.

            या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य तसेच आय एम एचे सदस्य उपस्थित होते. अडीच तास चाललेल्या या बैठकीत दहा कलमी कार्यक्रमाबाबत चर्चा होऊन यात नियंत्रणासाठी पुढील दहा कलमी कृती योजना निश्चित करण्यात आल्या आहेत.

            तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सदस्यांनी लसीकरण तसेच विलगीकरण यावर भर देत कुपोषित बालकांकडे अधिक लक्ष देण्यासंदर्भात मत व्यक्त केले. काही खाजगी डॉक्टर्स यांनी जनजागृतीवर भर देऊन लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविताना ती ठराविक काळापुरती घ्यावी. याबाबत व्यापक जनजागृती करावी, अशाही सूचना यावेळी मांडण्यात आल्या.

               या बैठकीतील आलेल्या सूचना आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.सावंत यांच्याशी पुन्हा सविस्तर चर्चा करून अतिरिक्त डोसमनुष्यबळ आणि जनजागृती तसेच धर्मगुरूलोकप्रतिनिधींचा सहभाग यावर बैठक घेवून पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले.

            बैठकीत आयएमएबालरोग तज्ज्ञजागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासह आरोग्‍य विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

दहा कलमी कार्यक्रम

तापपुरळ रुग्णाचे गतीमान सर्वेक्षण

राज्यातील गोवर हॉट स्पॉटचा शोध – उद्रेक स्थळेलसीकरण कमी असणारे भागलोकसंख्येची दाटीवाटी असणारेवंचित समाज समूह राहत असणारे आणि कुपोषण अधिक असणारे भाग या क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार आहे.

विभागीय स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके आणि स्थानिक सूक्ष्म कृती आराखडा

९ महिने ते ५ वर्षेवयोगटातील बालकांसाठी विशेष लसीकरण अभियान आणि उद्रेक प्रतिसाद लसीकरण

कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष – प्रत्येक कुपोषित बालकाला प्राधान्याने उपचारात्मक पोषणजीवनसत्व अ आणि गोवर लसीकरण

आंतर विभागीय समन्वय – नगरविकासमहिला आणि

 बालविकासअल्पसंख्याक कल्याण विभाग यांचेशी समन्वय.

राज्यातील सर्वांसाठी गोवर उपचार मार्गदर्शन सूचना

गोवर प्रयोगशाळा जाळ्यांचे अधिक विस्तारीकरण

गोवर रुग्ण आणि मृत्यूचे सखोल साथरोग शास्त्रीय विशेष सर्वेक्षण आणि त्यानुसार कृती योजनादीर्घकालीन उपाययोजनेसाठी आवश्यक संशोधन आणि सर्वांगीण शहरी आरोग्य यंत्रणेसाठी योजना

सामाजिक प्रबोधनलोकसहभाग आणी आरोग्य शिक्षण

Back to top button
error: Content is protected !!