महाराष्ट्र
Trending

महिलांची स्वतः कपडे फाडून नग्न होऊन आरडाओरड ! बीड न्यायालयाच्या गेटसमोर आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत !!

दरोड्यातील कुविख्यात दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

औरंगाबाद, दि. 30 – दरोड्याच्या गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात असल्याची बातमी स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावला. सदर आरोपी न्यायालयाच्या गेटसमोर दिसून आला. यावेळी पोलिसांनी त्याला अटक करण्याची कारवाई कली असता आरोपीसोबतच्या महिलांनी त्यास मनाई केली. आरोपीच्या महिला नातेवाईक यांनी स्थागुशा पथकासोबत हुज्जत घालून पोलीसांनी आरोपीस घेऊन जाऊ नये म्हणून मज्जाव केला. सदर महिलांनी त्यांच्या अंगातील कपडे स्वतः फाडून घेऊन सार्वजनिक ठिकाणी नग्न होऊन आरडोओरड केली. याप्रकरणी पोलिसांनी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाणे पाचोड हद्दीत दिनांक २२/०६/२०२२ रोजी दाभरुळ शिवारात रात्रीचे वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन गंभीर दरोड्याचे गुन्हे घडले होते. त्यानुसार पोस्टे पाचोड येथे गुरंन २१०/२०२२ कलम ३९५ भादवी व गुरंन २११/२०२२ कलम ३९५ भादवी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक  मनीष कलवानिया , औरंगाबाद ग्रामीण यांनी सदर गुन्हयाचे तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमंलदार यांना गुन्हयात सहभागी असेलेले आरोपी निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखने यापूर्वी सदर गुन्हे उघडकिस आणून आरोपी शाहरूख आब्रश्या पवार (रा . टाकळीअंबड ता . पैठण) व रोहीदास ऊर्फ रोहया रामभाऊ बर्डे (रा. चौडांळा ता . पैठण० यांना अटक केली होती व इतर आरोपीतांना निष्पन्न केले होते.

त्यानुसार निष्पन्न फरार आरोपी नितीन ऊर्फ नित्या मिश्रीलाल चव्हाण (रा. मालेगाव खुर्द ता . गेवराई जि . बीड) याचे मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मागील दोन महिन्यांपासून होते परंतु तो सतत त्याच्या राहण्याची ठिकाणे बदलत होता. तो सध्या प्रॉपर बीड शहरात आलेला असल्याची गोपनिय बातमी मिळाली तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तो सध्या जिल्हा व सत्र न्यायालय बीडच्या आवारात असल्या बाबत खात्री पटल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २९ /०९ /२०२२ रोजी बीड शहरात गेले.

तेथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखा बीडचे अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेऊन वरील आरोपीताचा जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात शोध घेत असता तो मा . न्यायालयाच्या गेटसमोर नगर रोडवर उभा असलेला दिसला. त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्याच्या जवळ गेले असता सदर आरोपीसोबत असलेल्या त्याच्या महिला नातेवाईक यांनी स्थागुशाचे पथकासोबत हुज्जत घालून पोलीसांनी आरोपीस घेऊन जाऊ नये म्हणून मज्जाव केला.

सदर महिलांनी त्यांच्या अंगातील कपडे स्वतः फाडून घेऊन सार्वजनिक ठिकाणी नग्न होऊन आरडोओरड केली. अंगविक्षेप केला तसेच पोलीस पथकाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तरीही स्थागुशा औरंगाबाद ग्रामीणच्या पथकाने नितीन मिश्रीलाल चव्हाण (वय २५ वर्ष , रा . मालेगाव खुर्द ता . गेवराई जि.बीड) यास ताब्यात घेतले आहे.

सदर महिलांना स्थानिक महिला पोलीस अंमलदार व दंगाकाबु पथक बीडच्या मदतीने ताब्यात घेऊन पो . ठाणे शिवाजी नगर बीड येथे आणले. पथकातील पोउपनि प्रदीप ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पो . ठाणे शिवाजीनगर , बीड येथे शासकीय कामात अडथळा करणे , शासकीय नौकराने आपले कर्तव्य पार पाडू नये म्हणून मज्जाव करणे बाबत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी नितीन मिश्रीलाल चव्हाण याच्या विरुध्द दरोडा, जबरी चोरी अशा स्वरुपाचे खालील प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत .

१) पाचोड २१० / २०२२ कलम ३९५ भादंवि
२)पाचोड २११/२०२२ कलम ३९५ भादंवि
३) पैठण २०४ /२०२२ कलम ३९४, ३४ भादंवि

सदर आरोपीस पो . ठाणे पाचोड येथे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी जमा करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील आणखी गंभीर स्वरुपाचे गुन्हे सदर आरोपीकडून उघड होण्याची शक्यता आहे.

ही कामगिरी मनीष कलवानिया , पोलीस अधीक्षक , औरंगाबाद ग्रामीण ,  पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक , औरंगाबाद ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे , पोलीस उप निरीक्षक प्रदीप ठुबे , पोना शेख नदीम , शेख अख्तर , वाल्मीक निकम , विजय धुमाळ , पो . अंमलदार रामेश्वर धापसे , राहुल गायकवाड यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!