महाराष्ट्र
Trending

औरंगाबादेतील महत्त्वांच्या चौकात मुंबईच्या धरतीवर 31 एलईडी स्मार्ट सिग्नल ! गाडीचालकास 150 मीटरवरून येणार अंदाज !!

स्मार्ट सिग्नल वाढवत आहेत वाहतूक सुरक्षा आणि शहराचे सौंदर्य

औरंगाबाद, दि. १८ : शहराच्या सौंदर्य व वाहतूक सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) शहराच्या महत्त्वाच्या चौकांवर 31 एल ई डी स्मार्ट सिग्नल बसवले आहेत. या सिग्नल मुळे शहराला एक नवीन लूक मिळाला असून वाहतूक सुरक्षाही वाढली आहे.

केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद स्मार्ट सिटी नागरिकांना लक्षात घेऊन विविध प्रकल्प राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटी तर्फे स्मार्ट सिग्नल हा प्रकल्प आण्यात आला. यामध्ये मागच्या काही महिन्यांत एकूण 31 सिग्नल पूर्ण शहरात महत्त्वाच्या चौकात बसवण्यात आले. मुंबईच्या धरतीवर औरंगाबादला सुद्धा पूर्ण प्रक्षाशित ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले.

सिग्नल केवळ शहरातील सौंदर्यकरण वाढविण्याच्या उद्देशानेच नाहीत तर वाहतूक सुरक्षेचा दृष्टीने महत्त्वाचे आहे. स्मार्ट सिटीचे सहायक प्रकल्प व्यवस्थापक ऋषिकेश इंगळे यांच्या म्हणण्यानुसार स्मार्ट सिग्नलचा प्रयोग मुंबईमध्ये यशस्वी झाल्यानंतर इथे राबविण्यात आला. इंगळे म्हणाले की, “वाहनचालक १५० मीटर पर्यंत सिग्नल पाहू शकतात आणि त्यानुसार वाहनांचा वेग समायोजित करू शकतात.”

स्मार्ट सिग्नलचा कमान सारखा भाग रस्त्यावर येतो ज्याचावर एलईडी दिवे बसवून पूर्ण प्रकाशित केला गेला आहे. जसे जसे सिग्नल चे संकेत बदलतात तसे तसे ह्या पूर्ण प्रकाशित सिग्नलचे रंग बदलतात. हा प्रकल्प 1 कोटीचा लागत ने राबविण्यात आला आहे. यामध्ये एका वर्षाची देखभाल दुरुस्ती सामील आहे.

या प्रकल्पांतर्गत औरंगाबाद स्मार्ट सिटी ने जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास आणि व्हीआयपी रोडवरील महत्त्वाच्या चौकांवर असे स्मार्ट सिग्नल बसवले गेले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रकल्प व्यवस्थापक राबवित आहेत.

Back to top button
error: Content is protected !!