राष्ट्रीय
Trending

घराबाहेर शौच करणाऱ्या पाळीव कुत्र्याला विरोध केल्याने महिलेने तरुणाच्या थोबाडीत लगावली !

गाझियाबाद (यूपी), 18 ऑक्टोबर – गाझियाबादमध्ये घराबाहेर शौच करणाऱ्या पाळीव कुत्र्याला आक्षेप घेतल्याने आणि तिला चावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका तरुणाला एका महिलेने चापट मारली.

याप्रकरणी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

इंदिरापुरमच्या शक्तीखंडमध्ये घडलेल्या कथित घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे.

पोलिसांनी सांगितले की तरुण नावाचा युवक सोमवारी संध्याकाळी एका निवासी सोसायटीच्या आवारात शतपावली करत होता. तेंव्हा त्याने पाहिले की ती महिला आपल्या घरासमोर कुत्रा फिरवत होती.

तक्रारीनुसार, कुत्रा तरुण आणि त्याच्या मित्रावर भुंकला आणि त्याने त्यांना चावण्याचा प्रयत्न केला. यानंतर कुत्र्याने त्यांच्या फ्लॅटबाहेर शौचास सुरुवात केली.

तरुणाने यावर आक्षेप घेतल्यावर महिलेने त्याला चापट मारल्याचे त्यात म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!