महाराष्ट्रराष्ट्रीय

राज ठाकरेंनी कोट्यवधी डॉलर्सच्या वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणी “बॉम्ब गोळा” फोडला ! कंपन्यांकडे पैसे मागितले होते का ?

नागपूर (महाराष्ट्र), 19 सप्टेंबर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोट्यवधी डॉलर्सच्या वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प हातचा गेल्याने चौकशीची मागणी करत या कंपन्यांकडून पैसे मागितले होते का, असा सवाल उपस्थित केला.

ते म्हणाले की, उद्योग उभारणीत महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य असायचे पण ही परिस्थिती बदलत आहे.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला हलवल्याच्या वादावर विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, जे उद्योग महाराष्ट्रात उभारायचे होते ते आता इतर राज्यात का स्थलांतरित झाले आहेत, याची चौकशी व्हायला हवी. त्याला पैसे मागितले होते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षातील राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल खंत व्यक्त केली आणि कोण कोणाशी युती करेल हे समजणे किंवा सरकार स्थापन करणे कठीण असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

ते म्हणाले की, “महाराष्ट्रात असे अराजक आणि फसवे राजकारण मी पाहिले नाही. कोण कोणासोबत आहे, कोण सरकार बनवत आहे हे कोणालाच माहीत नाही.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने 2019 च्या निवडणुका भारतीय जनता पक्षासोबत युती करून लढवल्या होत्या पण निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्रिपदाच्या वाटणीवरून गदारोळ झाला.

ते म्हणाले की, “तुम्ही (उद्धव ठाकरे) 2019 च्या निवडणुकीपूर्वी युतीच्या अटी जाहीर का केल्या नाहीत? ठराविक पक्षांना मते देणारे लोक अशी फसवणूक पाहत राहतील का? हा मतदारांचा अपमान आहे.

राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या भेटीचे वर्णन “जुन्या मित्रांमधील सौजन्यपूर्ण भेट” असे केले.

ते म्हणाले की, विदर्भाला राज्याचा दर्जा देण्याबाबत जनतेने निर्णय घ्यावा.

आम आदमी पक्षासारख्या पक्षांनी मतदारांना निवडणुका जिंकण्यासाठी मोफत सुविधा दिल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, लोकांना फुकट नको, तर वाजवी किंमत आणि वेळेत वस्तू हव्या आहेत.

Back to top button
error: Content is protected !!