महाराष्ट्र
Trending

गंगापूरमधील शॉपी फोडून ७५ मोबाईल चोरणारे संगमनेरचे दोन चोरटे जेरबंद !

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

औरंगाबाद, दि. ०२ – गंगापूर शहरातील मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर येथून जेरबंद केले. गंगापूर येथून मोबाईल चारायचे आणि अहमदनगर जिल्ह्यातील संममनेर येथे ते विकायचे, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या चोरट्यांकडून तब्बल ४७ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

अमजद उमर पठाण (वय ४५ वर्षे रा. दिल्ली नाका, संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर) व दत्ता सीताराम गोसावी (रा. दिल्ली नाका, संगमनेर ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाेंनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेेली माहिती अशी की, दिनांक ०८/११/२०२२ रोजी अजीम अब्दुल रहिम कुरेशी (वय ३५ वर्षे, व्यवसाय- व्यापार, रा. कुरेशी मोहल्ला ता. गंगापूर जि. औरंगाबाद) यांनी पो.स्टे गंगापूर येथे तक्रार दिली. या तक्रारीत म्हटले की, की, दिनांक ०४/११/२०२२ रोजी २१:०० वाजेपासून ते दिनांक ०५/११/२०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने गंगापूर शहरातील शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या मालकीच्या न्यू साई संगम मोबाईल शॉपीचे छतावरील पत्रे उचकाटून आत प्रवेश केला. दुकानातील ८८,५००/- रुपये किमतीचे वेग वेगळ्या कंपनीचे एकूण ७५ मोबाईल हँडसेट चोरून नेले. या तक्रारीवरून पोलीस ठाणे गंगापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे.

या गुन्हयांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक व तांत्रीक विश्लेषणाआधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल हँडसेट हे संगमनेर शहरातील ए टू झेड या मोबाईल शॉपीचा मालक अमजद उमर पठाण याने विकत घेतलेले आहे. तो सदर मोबाईल हँडसेट लोकांन विक्री करीत आहे, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमजद उमर पठाण (वय ४५ वर्षे रा. दिल्ली नाका, संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर) यास ताब्यात घेतले.

त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने दत्ता सीताराम गोसावी (रा. दिल्ली नाका, संगमनेर ता. संगमनेर) याचेकडून चोरीचे मोबाईल घेतल्याची कबुली दिली. त्याच्या दुकानातून चोरीचे ५८,३५०/- रुपये किंमतीचे एकूण ४७ मोबाईल हैंडसेट व एक कोम्बो बॉक्स काढून दिल्याने ते जप्त करण्यांत आले. त्यानंतर मुख्य आरोपी दत्ता सीताराम गोसावी (२२ वर्षे, रा. दिल्ली नाका, संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपीतांना सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे गंगापूर यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे गंगापूर करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि प्रदीप डूबे, पोना दीपक सुरोशे, पोकों रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, राहूल गायकवाड, आनंद घाटेश्वर, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!