राष्ट्रीय
Trending

भटक्या कुत्र्यांच्या गुप्तांगावर सिरिंजने पेट्रोल फवारून छळ, डेअरीच्या दोन निर्दयी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल !

इंदूर (मध्य प्रदेश), 28 सप्टेंबर – इंदूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या गुप्तांगावर पेट्रोल फवारून त्यांना तीव्र वेदना दिल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

संयोगितागंज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शहरातील जावरा कंपाऊंड येथील एका डेअरीच्या दोन कर्मचाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा गुप्तांगावर सिरिंजने पेट्रोल फवारून बराच काळ छळ केल्याचा आरोप आहे.

अधिकारी म्हणाला, या क्रूर कृत्यामुळे असहाय्य प्राणी वेदनेने ओरडत होते. या कृत्याची माहिती मिळताच “पीपल फॉर अॅनिमल्स” या प्राणीमित्र संस्थेच्या इंदूर युनिटचे अध्यक्ष प्रियांशू जैन यांनी मंगळवारी रात्री संयोगितागंज पोलिस ठाण्यात प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि इतर संबंधित तरतुदींनुसार एफआयआर दाखल केला.

जैन म्हणाले, “प्रत्यक्षदर्शींनी आम्हाला सांगितले की, आरोपी त्यांच्या गुप्तांगावर पेट्रोल फवारले जात असताना वेदनेने रडत असलेले कुत्रे पाहून आनंद व्यक्त करत होते. ते स्वतःच्या आनंदासाठी निष्पाप प्राण्यांना भयंकर वेदना देत होते.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ज्या डेअरीच्या कामगारांनी भटक्या कुत्र्यांचा छळ केला तो शहरातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुख्य कार्यालयाला लागून आहे.

एक पोलीस अधिकारी म्हणाला, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Back to top button
error: Content is protected !!