कंधारच्या तहसीलदार व तलाठ्यांच्या स्वाक्षरीसाठी पैसे घेतल्याची तक्रार रफा-दफा करण्यासाठी लातूरच्या दोघांना 60 हजारांची लाच घेताना पकडले ! औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नांदेडमध्ये धडाकेबाज कारवाई !!
नांदेड/औरंगाबाद, दि. 21 – तुमच्या भावाने तहसीलदार व तलाठी कंधार यांच्या सह्या घेऊन देण्यासाठी 10,000/- रुपयांची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सदरचा तक्रार अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या मॅडम यांनी माझ्या मोबाईलवरपाठवला असून प्रकरण रफा-दफा करण्यासाठी मॅडमला १ लाख रुपये द्यावे लागेल, अशी मागणी करून नंतर 60 हजारांवर तडजोड होऊन दोघांना ही रक्कम घेताना औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई नांदेड जिल्ह्यात करण्यात आली.
सय्यद शकील सय्यद अजीमसाब (वय 38 वर्ष धंदा. कपडयाचा व्यापारी, रा. एसटी कॉलनी, पाण्याच्या टॉकीजवळ, ता.उदगीर, जि.लातूर) व सय्यद इस्माईल सय्यद अजीमसाब (वय 28 वर्ष धंदा. शिक्षण रा. एसटी कॉलनी, पाण्याच्या टॉकीजवळ, ता. उदगीर जि. लातूर) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अहमदपूर येथील तक्रारदाराने दिनांक 19.11.2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद येथे तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, त्यांचा भाऊ हा कंधार येथे राहतो व तो तहसील कार्यालय कंधार येथे लोकांचे कागदपत्र तयार करणे त्यांची काम करणे असे खाजगी रायटर म्हणून काम करतो व तो कंधार येथे राहावयास आहे.
दिनांक 15.11.2022 रोजी तक्रारदाराच्या भावाने त्यांना फोन करुन सागितले की, त्याला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नांदेड येथील मॅडम यांचा फोन आला होता. त्यांनी भावास सांगितले की तुमच्या विरुध्द आमच्या कार्यालयास तक्रार आली आहे. त्या तक्रारीच्या चौकशी करीता कार्यालयात या असे बोलणे झाल्याचे भावाने सांगितले. म्हणुन दुपारी दोन वाजता तक्रारदार व भावाने सांगितलेल्या मोबाईलवर फोन करुन मॅडम आपण ऑफीस मध्ये आहात का मी भाऊ बोलतो असे सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले की, मी आठ वाजे पावेतो ऑफीस मध्ये आहे तुम्ही एकटेच या असे फोनवर सांगितले व त्यानंतर अर्धा तासाने मोबाईलवरून तक्रारदाराच्या मोबाईलवर एका जणाचा फोन आला. त्याने विचारले तुम्ही मॅडमला भेटण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय येथे जाणार आहात. तुम्ही मॅडमला भेटायला जाऊ नका जांब येथे मला भेटायला या असे सांगितल्याने तक्रारदार जांब येथे गेला.
जांब येथे रात्री 07/30 वाजता ते पोहचले. परंतु जांब येथे त्या व्यक्तीस न भेटता तक्रारदार नांदेड येथे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात गेले. तेथून मॅडम यांच्या मोबाईल नंबरवर फोन केला. त्यांनी फोन रिसीव्ह केला पंरतु काही बोलल्या नाही. दिनांक 16.11.2022 रोजी तक्रारदाराने फोन लावला. कॉलर आयडीवर ….. साहेब मुंबई असे नाव आले. त्यांच्या बरोबर बोलणे झाल्यावर त्यांनी तक्रारदाराला उदगीर येथे शिवाजी चौक येथे भेटण्यास बोलवले. त्यानुसार तक्रारदार उदगीर येथे दुपारी 02.00 वाजता पोहचले. त्या व्यक्तीस भेटले. तेव्हा त्याचे नाव सैय्यद असल्याचे तक्रारदाराला समजले. त्याच्या बरोबर बोलत असताना त्याने त्यांच्या मोबाईलच्या व्हॉटसअप वर तक्रारदाराच्या भाऊ विरुध्दचा तक्रारी अर्ज दाखविला व सांगितले की, सदरचा अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या मॅडम यांनी त्यांच्या मोबाईलवर पाठवला आहे असे सांगून कळविले की, तुमचा भाऊ याने तहसीलदार व तलाठी कंधार यांच्या सह्या घेऊन देण्यासाठी 10,000/- रुपये ची मागणी केल्याची तक्रार आहे.
त्या अर्जावर लाचलुचपत कार्यालयाकडून कारवाई न करण्यासाठी व त्याचा तक्रारदार यांना योग्य रिर्पाट पाठविण्यासाठी मॅडमला एक लाख रुपये द्यावे लागेल. असे सांगितले तक्रारदाराने त्यांना एक लाख रुपये देण्याची परिस्थिती नसल्याचे सांगून तडजोड करून 70,000/- हजार रुपये देऊ शकतो असे सांगितल्याने त्याने लागलीच मॅडमला फोन करून सांगितले की, तक्रारी अर्जातील व्यक्ती समोर हजर आहे, बोलणी झाली आहे. त्याचे विरुध्द तक्रारी अर्जावर काही कारवाई करु नका असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मॅडम यांना सांगितले. त्यानंतर तक्रारदार घरी गेले. त्यानंतर तो व्यक्ती फोन करून पैश्याची मागणी करीत असल्याने व त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत कार्यालय नांदेड येथील मॅडम पैश्याची मागणी करीत असल्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात येथे दिनांक 18/11/2022 रोजी गेलो होतो. त्यांच्या सांगण्याप्रमाणे तक्रारदार औरंगाबाद येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात येऊन तक्रार दिली.
सय्यद हे आज माझ्या मुळ घरी कंधार येथे भेट घेण्यासाठी येणार आहे. तरी माझ्या तक्रारी प्रमाणे पडताळणी करून सय्यद यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नांदेड येथील मॅडम यांच्याकरीता लाचेची रक्कम मागणी करून स्वीकारल्यास त्यांचे विरुध्द कारवाई करावी, अशी तक्रारदाराने रितसर तक्रार दिली.
त्यानंतर दिनांक 19/11/2022 रोजी पोउपअधिक्षक गांगुर्डे यांनी लाच मागणी पडताळणी करण्यासाठी कंधार जिल्हा नांदेड येथे तक्रारदार यांच्या मुळ घरी जाण्याचे ठरविले. दोन्ही पंच व सापळा पथकातील सदस्य सर्वजण लाचलुपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने कंधार जि.नांदेड येथे रवाना झाले. कंधार जि.नांदेड येथे घराजवळ आलीकडे सुरक्षित ठिकाणी आल्यावर वाहन थांबविण्याकरीता पोलीस उप अधिक्षक गांगुर्डे यांना सांगितले. त्यानंतर सदर ठिकाणी तक्रारदाराचे भाऊ जवळ आले तेव्हा मी त्यांची ओळख सापळा पथकातील सर्व सदस्य, अधिकारी व पंचांना करून दिली. सदर ठिकाणी पोलीस उप अधिक्षक गांगुर्डे यांनी भावास तसेच पंचास व पडताळणी पथकास आवश्यक सूचना दिल्या.
त्यानंतर सय्यद हे राहत्या घरी आमची भेट घेण्यासाठी येणार असल्याने पोलीस उप अधिक्षक गांगुर्डे यांनी सापळ्यासंबंधी सर्वांना सूचना दिल्या. त्यानंतर तक्रारदार व त्यांचा भाऊ व पंच सय्यद यांची भेट घेण्यासाठी घराकडे रवाना झाले. काही वेळाने सय्यद हे घरी आले. त्यानंतर भाऊ यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नांदेड येथे आलेल्या तक्रारीबाबत चर्चा झाली. त्यानंतर श्री सय्यद म्हणले की, मी तुम्हाला मदत करतो असे म्हणुन पंचासमक्ष मोबाईलवर 70000 आकडा टाईप करून दाखविला. त्यावर तक्रारदार म्हणाले की, 60 हजार रुपये आता देतो, त्यावर सय्यद म्हणले की ह.. त्यावर मी म्हणलो की, 10 हजार रुपये दोन चार दिवसांत करून देतो, त्यावर सय्यद म्हणले की दोन दिवसांत दे, जबान दे, असे म्हणून लाचेची मागणी केली.
त्यानंतर सर्वजण तक्रारी बाबत चर्चा केली. त्यावेळी सय्यद म्हणाले की, तुम्ही उद्या सकाळी मला फोन करून भेटण्यासाठी या असे म्हणून सय्यद हे घरातून निघून गेले. दिनांक 20/11/2022 रोजी लाचेची 60,000 हजार रक्कम देण्याचे ठरले. त्यानंतर शासकीय वाहनाने जांब येथून शिरुर कडे जाणा-या HP पेट्रोलपंपच्या जवळील परिसरात रवाना होवून सुरक्षीत ठिकाणी पोलीस उप अधिक्षक गांगुर्डे यांनी त्यांचे शासकीय वाहन थांबवले. पथक पेट्रोलपंपच्या आजुबाजुला सापळा लावून थांबले. त्यानंतर तक्रारदार सय्यद यांना भेटले असता तक्रारदाराच्या भावाच्या तक्रारीसंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर सय्यद हे त्याचा भाऊ इस्माईल यांच्याकडे बघून त्याच्याकडे पैसे देण्याबाबत सांगून इस्माईल यांना म्हणला की, इस्माईल ले ले त्यावर तक्रारदार म्हणले की, गीन के ले लो.. साठ हजार रुपये है.. एक बार हाथ मारलो ना.. हम भी दुसरे के पास से ले के आये हुये है.. असे म्हणून सय्यद यांच्या सोबत असलेला त्यांचा भाऊ इस्माईल यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर पथकाने त्यांच्यावर झडप घातली. सापळा पथकाने सय्यद शकील व त्यांचे भाऊ नामे सय्यद इस्माईल यांना ताब्यात घेतले.
त्यांना त्यांचे संपूर्ण नाव पत्ता विचारले असता सय्यद शकील यांनी त्याचे नाव सय्यद शकील सय्यद अजीमसाब (वय 38 वर्ष धंदा. कपडयाचा व्यापारी, रा. एसटी कॉलनी, पाण्याच्या टॉकीजवळ, ता.उदगीर, जि.लातूर) व सय्यद इस्माईल सय्यद अजीमसाब (वय 28 वर्ष धंदा. शिक्षण रा. एसटी कॉलनी, पाण्याच्या टॉकीजवळ, ता. उदगीर जि. लातूर) असे सांगितले. त्यांच्यावर मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट