महाराष्ट्र
Trending

अलिबागमध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू !

Story Highlights
  • मुंबईपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या अलिबाग येथे आरसीएफ प्लांटचा एसी दुरुस्त करत असताना सायंकाळी 4:45 च्या सुमारास एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाला.

मुंबई, 19 ऑक्टोबर – महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF) प्लांटमध्ये बुधवारी संध्याकाळी एसी कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन कामगार जखमी झाले.

रायगड पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या अलिबाग येथे आरसीएफ प्लांटचा एसी दुरुस्त करत असताना सायंकाळी 4:45 च्या सुमारास एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाला.

रायगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, “या घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. पुढील तपास सुरू असून आम्ही अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहोत.

जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.

Back to top button
error: Content is protected !!