महाराष्ट्र
Trending

पैठण: मायगाव व गोपेवाडीचे तीन चोरटे जेरबंद, टोळीकडून शेतातील विद्युत मोटारी जप्त !

ओरंगाबाद, दि. 16- विदुयत मोटार चोरी करणारी टोळी पैठण पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला असून साथीदारांची माहिती मिळवण्यातही पोलिसांना यश आले आहे. आधीच अडचणीत आलेल्या शेतकर्यांना या चोरट्यांनी जेरीस आणले होते.

१) आंबादास रुस्तुम गायकवाड (वय ३४ वर्षे, रा. मायगाव ता. पैठण), २) तुकाराम विनायक निर्मळ (वय ३४ वर्ष, रा. गोपेवाडी ता. पैठण), ३) बद्रीनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ४० वर्षे, रा. गोपेवाडी ता. पैठण) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीस स्टेशन पैठण हद्दीत चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आणि दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी यापूर्वीच निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी आपले अधिनस्त अंमलदार यांना या चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी सूचना दिल्या.

दिनांक १०/११/२०२२ रोजी यातील फिर्यादी श्रीरंग माणिकराव पठाडे (वय ४१ वर्षे, व्यवसाय शेती रा. नविन कावसान पैठण, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांनी तक्रार दिली की, त्याच्या शेतातील ५०००/रुपये किमतीची पाच एच.पी.ची आर्या कंपनीची पाण्यातील मोटार (जुनी वापरती किंमत अंदाजे १०००/- रुपये किंमतीचे) ९० फुट पटटी केबल वायर (किंअं. एकूण ६००० रुपये) मुद्देमाल चोरांनी चोरुन नेला.

यावरून गुन्ह्याची उकल करून तपासकामी आरोपी १) आंबादास रुस्तुम गायकवाड (वय ३४ वर्षे, रा. मायगाव ता. पैठण), २) तुकाराम विनायक निर्मळ (वय ३४ वर्ष, रा. गोपेवाडी ता. पैठण), ३) बद्रीनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ४० वर्षे, रा. गोपेवाडी ता. पैठण) यांना अटक करण्यात आली.

न्यायालयातून ०३ दिवस पी.सी.आर. मिळाल्यानंतर पी.सी.आर. काळात आरोपीतांकडे बारकाईने तपास करून गुन्हयातील चोरीस गेलेला माल १) ५०००/ रुपये किमतीची पाच एच.पी.ची आर्या कंपनीची पाण्यातील मोटार जुनी वापरती किंमत अंदाजे तसेच आरोपीतांनी यापूर्वी चोरी केलेली शेतक-याची २) ५०००/ रुपये किमतीची पाच एच.पी.ची विनस कंपनीची पाण्यातील मोटार जुनी वापरती किंमत अंदाजे असा एकूण १०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हयामध्ये इतर साथीदारांचा देखील सहभाग निष्पन्न झाला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक लांजेवार, औरंगाबाद ग्रामिण, उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण डॉ.विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उप निरीक्षक संजय मदने, पोहेकॉ नुसरत शेख, पोलीस नाईक भगवान धांडे, नरेंद्र अंधारे, पोकों मुज्जसर पठाण, हर्षल वाघ, चालक पोहेकॉ कल्याण ढाकणे आदी यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!