राष्ट्रीय
Trending

लॉकअपमध्ये बलात्काराच्या आरोपीला मोबाइल पुरवणारे तीन पोलिस निलंबित ! इन्स्टाग्रामवर व्हिडिओ कॉलिंगने फुटले बिंग !!

Story Highlights
  • यातून पोलिसांचा कर्तव्यात निष्काळजीपणा दिसून येत असून, पोलिस खात्याची प्रतिमाही मलीन झाली आहे.

गाझियाबाद (यूपी), 2 नोव्हेंबर – गाझियाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मुनीराज जी यांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयाच्या लॉकअपमध्ये बलात्काराच्या आरोपीला मोबाइल फोन पुरवल्याबद्दल दोन मुख्य हवालदार आणि एका हवालदाराला निलंबित केले. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

या तिघांचीही विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक (ग्रामीण) इराज राजा यांनी सांगितले की, आरोपी विशू तोमरला 21 ऑक्टोबर रोजी खटल्याच्या संदर्भात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश फास्ट ट्रॅक यांच्या न्यायालयात नेण्यात आले. तेथे इन्स्टाग्रामवर व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्याच्या मित्राशी चॅट करण्यासाठी पोलिसांकडून मोबाइल मिळवण्यात त्याने यश मिळवले.

या चॅटचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि याची दखल घेत, चौकशी करण्यात आली. त्यानंतर मुख्य हवालदार फिरोज मेहंदी आणि ऋषी कुमार आणि कॉन्स्टेबल सरफराज अली खान यांना मंगळवारी संध्याकाळी निलंबित करण्यात आले.

ते म्हणाले, यातून पोलिसांचा कर्तव्यात निष्काळजीपणा दिसून येत असून, पोलिस खात्याची प्रतिमाही मलीन झाली आहे. आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले असून या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीही सुरू करण्यात आल्याचे एसपी ग्रामीण यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!