मोरबी पूल दुर्घटना : ओरेवा ग्रुपचे दोन मॅनेजर आणि दोन उपकंत्राटदारांना पोलिस कोठडी !
- पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक अहवालानुसार, पुलाचे फ्लोअरिंग बदलण्यात आले होते, परंतु तारा बदलल्या नाहीत आणि नवीन फ्लोअरिंगचे वजन ते (जुन्या वायर) सहन करू शकल्या नाहीत.
मोरबी (गुजरात), 2 नोव्हेंबर – गुजरातमधील मोरबी येथील केबल पूल दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांपैकी चार जणांना मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली तर अन्य पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ओरेवा ग्रुपच्या दोन व्यवस्थापक आणि दोन उपकंत्राटदारांना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
फिर्यादी एच.एस. पांचाळ यांनी सांगितले की, मुख्य न्यायदंडाधिकारी एम.जे. खान यांनी सुरक्षा रक्षक आणि तिकीट बुकींग क्लर्कसह अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे कारण पोलिसांनी त्यांची कोठडी मागितली नाही.
या संदर्भात सरकारी वकिलांनी मंगळवारी न्यायालयात सांगितले की, मोरबीच्या केबल पुलाच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडे ते करण्याची क्षमता नाही.
रविवारी संध्याकाळी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. फॉरेन्सिक अहवालाचा संदर्भ देत फिर्यादी पक्षाने सांगितले की, पुलाचे फ्लोअरिंग बदलण्यात आले होते, परंतु त्याच्या तारा बदलल्या नाहीत आणि नवीन फ्लोअरिंगचे वजन ते (जुन्या वायर) सहन करू शकत नाहीत.
पोलिसांनी सोमवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 304 नुसार नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ज्या चार जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे त्यात ओरेवाचे व्यवस्थापक दीपक पारेख आणि दिनेश दवे, दुरुस्तीचे कंत्राटदार प्रकाश परमार आणि देवांग परमार यांचा समावेश आहे.
न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएफ) अहवालाचा संदर्भ देत पांचाळ यांनी न्यायालयाला सांगितले की, नवीन फ्लोअरिंगच्या वजनामुळे पुलाची मुख्य वायर तुटल्याचे फॉरेन्सिक तज्ञांचे मत आहे.
पांचाळ यांनी पत्रकारांना सांगितले की, “फॉरेन्सिक अहवाल सीलबंद कव्हरमध्ये सादर करण्यात आला असला तरी, रिमांड अर्जाच्या सुनावणीदरम्यान, दुरुस्तीच्या वेळी पुलाच्या तारा बदलल्या नसून फक्त फ्लोअरिंग बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले… अॅल्युमिनिअमच्या पत्र्याच्या चार थरापर्यंत पुलाचे वजन वाढले आणि वजनामुळे वायर तुटली.
दुरुस्तीचे काम करणारे दोन्ही कंत्राटदार हे काम करण्यास पात्र नाहीत, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.
फिर्यादी म्हणाले की, “असे असतानाही 2007 मध्ये आणि पुन्हा 2022 मध्ये पुलाच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदारांना देण्यात आले. त्यामुळे त्यांची निवड का करण्यात आली आणि कोणाच्या सांगण्यावरून त्यांची निवड करण्यात आली, याचा शोध घेण्याची गरज असल्याने त्यांना ताब्यात घेणे आवश्यक आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट