महाराष्ट्र
Trending

बदनापूर ते दिनेगाव दरम्यान तीन तासांचा लाईन ब्लॉक, दोन रेल्वे गाड्यांवर परिणाम !

नांदेड, दि. 25 – नांदेड रेल्वे विभागातील बदनापूर ते दिनेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान दिनांक 27 ऑक्टोबर ते 22 नोवेंबर, 2022 दरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी दुपारी 15.20 ते 18.20 दरम्यान रेल्वे पटरी ची देखभाल तसेच दुरुस्ती करण्याकरिता तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे, या लाईन ब्लॉक मुळे पुढील दोन गाड्यांवर परिणाम झाला आहे.

1) गाडी संख्या 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस  दिनांक 27 ऑक्टोबर ते 22 नोवेंबर, 2022 दरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी औरंगाबाद येथून 180 मिनिटे उशिरा सुटेल. औरंगाबाद येथील तिची नियमित वेळ दुपारी 16:15 वाजता सुटण्या ऐवजी 18.55 वाजता सुटेल.

2) गाडी संख्या 17661 काचीगुडा ते रोटेगाव डेमू दिनांक 27 ऑक्टोबर ते 22 नोवेंबर, 2022 दरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी परभणी ते जालना दरम्यान 70 मिनिटे उशिरा धावेल.

Back to top button
error: Content is protected !!