महाराष्ट्र

“नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी” पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय – जयंत पाटील

मुंबई दि. १८ ऑक्टोबर – ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असे चित्र निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे असेही ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!