नांदेड – तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील इतरांचे नाव काढून तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 4000/-रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 3500/- रुपये लाच स्वीकारली.
बालाजी सीताराम राठोड (वय 44 वर्ष, पद -तलाठी, तलाठी सज्जा नायगाव, ता. नायगाव, जि.नांदेड, रा. कृष्ण वाडी तांडा ता. मुखेड, जि.नांदेड) असे आरोपीचे नाव आहे.
दि.07/11/2022 रोजी तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच दिवशी दि.07/11/2022 रोजी लाच मागणी पडताळणी केली. एकूण रु.4,000 लाच मागितली होती मात्र तडजोडीअंती 3500 रुपये घेतले.
ही कारवाई डॉ राजकुमार शिंदे, पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड. यांच्या मार्गदर्शनाखाली धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधिक्षक, पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक, सापळा अधिकारी म्हणून गजानन बोडके, पोलीस निरीक्षक तर या सापळा पथकामध्ये पोलीस निरीक्षक ढवळे, सपोउपनि संतोष शेट्टे, पोना राजेश राठोड, पोशि ईश्वर जाधव, पोशि यशवंत दाभनवाड , चापोना प्रकाश मामुलवार ला.प्र.वि.युनिट नांदेड यांचा समावेश होता.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड
मोबाईल क्रमांक 9623999944
राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट