ठाणे (महाराष्ट्र), ९ नोव्हेंबर – महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी लोकल ट्रेनवर दगडफेक केल्याने तीन प्रवासी जखमी झाले. रेल्वे पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना कळव्याजवळ मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्याने येथे वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकाऱ्याची भेट घेतली आणि दोषींवर कारवाई तसेच पाळत वाढवण्याची मागणी केली.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट