महाराष्ट्र
Trending

जालना शहरात घरावर जमावाकडून दगडफेक ! तलवारी काठ्या व दगड घेऊन दहशत !!

जालना, दि. 8- किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना जालना शहरातील वलीमामू दर्गा परिसरात शुक्रवारी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पायघन यांनी धाव घेऊन जमावास शांत केले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घडना घडली.

कोमल काल्यासिंग राजपूत (रा. वलीमामू दर्गा परिसर) याःच्या फिर्यादीवरून सुमारे 40 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांनीही घटनास्थळी भेट माहिती घेतली व योग्य ते निर्देश दिले.

पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,आरोपींनी जमाव जमवून तलवारी काठ्या व दगड घेऊन शिवागीळ केली. राजपूत यांच्या घरावर हल्ला केला. आजूबाजूच्या घरावरही हल्ला करून नुकसान केले. या आशयाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!