महाराष्ट्र
Trending

एकच मिशन जुनी पेन्शन, मुख्यालय सक्ती नको, अशैक्षणिक कामे काढा.. शिक्षकांच्या घोषणांनी आझाद मैदान दणाणले !

आदर्श शिक्षक समितीचे आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन, संघटनेकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना 21 मागण्यांचे निवेदन

Story Highlights
  • आंदोलनाला औरंगाबाद येथील दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

मुंबई, दि. 1 – महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने १ नोव्हेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर जोरदार राज्यव्यापी धरणे आंदोलन करून राज्यातील शिक्षकांचे दीर्घकाळा पासून प्रलंबित असलेले सुमारे २१ विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

आंदोलन संस्थापक दिलीप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तर राज्य अध्यक्ष रामदास सांगळे, राज्य नेते अंकुश काळे, मुक्ता पवार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा ते पाच यावेळेत आंदोलनं करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व ग्रामविकासमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

आंदोलन स्थळी आमदार नागो गाणार, आमदार आसगावकर, आमदार लाड विविध लोकप्रतिनिधी व संघटना प्रतिनिधी यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना सुरू करणे, २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, मुख्यालय सक्ती करण्यात येऊ नये, राज्यातील उप शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख , पदवीधर शिक्षक, प्रशाला मधील वर्ग २ मुख्याध्यापक रिक्त पदे भरणे, सर्व अशैक्षणिक कामे ,व अवाजवी उपक्रम टपाल कामे बंद करणे,

डीएड बीएड धारक यांची भरती करून राज्यातील प्राथमिक शिक्षक रिक्त पदे भरणे, वस्ती शाळा शिक्षक यांची मूळसेवा ग्राह्य धरणे, शिक्षक मतदार संघात प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क देणे, आश्वासित योजना सुरू करणे, कला क्रीडा शिक्षकांना नियुक्त्या देणे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना खाजगी शाळा शिक्षकांप्रमाणे रजा रोखीकरण लाभ मिळणे आदी मागण्या आहेत.

मागील दोन अडीच दशके प्रश्नांबाबत शासन स्तरावरून संघटनांची आश्वासन देऊन सरकार व प्रशासन बोळवण करीत आलेले आहे, आतापर्यंत न्याय हक्काच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक सरकार कडून दुर्लक्ष होत आलेले आहे. शिक्षकांना न्याय मिळत नसल्याने त्यात विविध प्रकारचे वादग्रस्त विषय यामध्ये मुख्यालय सक्ती, अनेक अशैक्षणिक आणि टपाल कामे, जिल्ह्यात जिल्ह्यातील शेकडो शिक्षकाची रिक्त पदे याचा परिणाम सरकारी शाळेवर होत आहे.

गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांच्या पाल्याच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे, अशी भूमिका दिवसभर आंदोलन कर्ते यांनी मांडली. एकच मिशन जुनी पेन्शन, मुख्यालय सक्ती करू नका, शाळा बंद करू नका, अशैक्षणिक कामे काढा आशा विविध मागण्यांच्या घोषणा देऊन मैदान दणाणून सोडले होते. आंदोलनाला राज्यभरातून शेकडो आदर्शचे कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

आंदोलनाला औरंगाबाद येथील दोनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यामध्ये राज्य नेते के सी गाडेकर, राज्य सचिव अंजुम पठाण, दीपा देशपांडे, पुष्पा दौड, विष्णू गाडेकर, संतोष पा बरबंडे, किशोर बिडवे, बबिता नरवटे, अनुपमा मोती या ळे , साधना शेवनते, उजवला क्षीरसागर, रेखा भोसले, अनिता भटकर, शिवाजी एरंडे, संजीव देवरे , बाबूलाल राठोड, नजीर शेख, ज्ञानेश्वर पठाडे, राजेश आचारी, अनिल सोनवणे, राजेश पोंदे, लक्षणम नरसिंगे, रमेश जवादवाड, बाबासाहेब सांगळे, मनोहर लबडे, सोमनाथ बर्डे, जे बी सोनवणे, मनोहर पटे, नितीन भागवत,संभाजी खंदारे ,गौतम गायकवाड, संदीप कांबळे, कचरू होले, भीमराज धाडबळे सह शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.

Back to top button
error: Content is protected !!