महाराष्ट्र
Trending

कोतवालांना पदोन्नतीची विशेष दिवाळी भेट !

पुणे दि.21- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी कोतवाल संवर्गातील ५७ कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण जवळ आला असताना पदोन्नतीची विशेष भेट दिली आहे.

 महाराष्ट्र राज्यातील कोतवाल महसूल विभागाच्या अधिपत्याखालील अवर्गीकृत कर्मचारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील निर्णयानुसार महसूल विभागांतर्गत असणाऱ्या गट ‘ड’ च्या प्रथम नियुक्तीच्या पदांपैकी नियमित पदांमधून  ४० टक्के  पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत.

पुणे जिल्ह्याच्या आस्थापनेवरील गट ‘ड’ शिपाई संवर्गाच्या एकूण पदांच्या ४० टक्क्यांनुसार येणाऱ्या पदापैकी ५९ पदे कोतवालातून गट ‘ड’ शिपाई पदावर प्रथम नियुक्ती देण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.

जिल्हाधिकारी  डॉ. देशमुख, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, भूसंपादन अधिकारी श्रीमंत पाटोळे  यांच्या मार्गदर्शनानुसार कोतवालातून गट ‘ड’ शिपाई पदावर प्रथम नियुक्ती देण्याचे कामकाज  प्राधान्य देत पूर्ण  करण्यात आलले आहे.

गुणवत्तेनुसार पात्र असलेल्या  ५७ कोतवाल कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर अनोख्या भेट स्वरूपात डॉ. देशमुख यांच्या हस्ते   गट ‘ड’ शिपाई संवर्गाच्या रिक्त पदावर प्रथम नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले.

पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये शिरूर तालुक्यातील ३, हवेली २, मावळ २,  खेड ४, दौंड ११, पुरंदर ६, बारामती ६, इंदापूर ५, जुन्नर ७, आंबेगाव १, भोर ९ आणि वेल्हा तालुक्यातील एक कोतवालांचा समावेश आहे, अशी माहिती तेली यांनी दिली आहे. पदोन्नतीमुळे या सर्व कोतवालांसाठी ही दिवाळी  आनंददायी ठरण्यासोबतच स्मरणीयही राहणार आहे

Back to top button
error: Content is protected !!