महाराष्ट्र
Trending

समृद्धी महामार्गांवरून जात असताना शिंदे गटाच्या जालन्यातील सुमारे 15 गाड्या एकमेकांवर भिडल्या !

जालना, दि. 4 – समृद्धी महामार्गांवरून जात असताना शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात झाला. ही घटना आज दौलताबादजवळ घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत 15 गाड्यांचे नुकसान झाले.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या शिवसेनेच्या दोन्हा गटांचा दसरा मेळावा मुंबईत आयोजित केला असून आज, राज्याच्या अनेक भागांतून कार्यकर्ते रवाना झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जालन्यातून अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने आज रवाना झाले.

दौलताबाद येथील समृद्धी महमार्गावरून जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात झाला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. सुमारे 15 वाहनांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान मात्र झाले.

जालन्याचे माजी आमदार आणि शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्त्वात दसरा मेळाव्यासाठी सुमारे 500 गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या. समृद्धी महामार्गावरून जात असताना काही गाड्यांचा अपघात झाला. 15 गाड्या एकमेकांवर भिडल्याची माहिती मिळत आहे.

Back to top button
error: Content is protected !!