महाराष्ट्र
Trending

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार !

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार

मुंबई, दि. 22 – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या, रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर असून परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची पहाणी ते करणार आहेत. शेत पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकर्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकारदरबारी पाठपुरावा करणार आहेत.

मराठवाड्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे.

त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या, रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 22 रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वित करणार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!