महाराष्ट्र
Trending

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा अपमान केला मी मुख्यमंत्री असतो तर कोणी जरी महिलेचा अपमान केला असता तर लाथ मारून हाकलला असता – उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात महिलेचा अपमान होतोत तरीसुद्धा तुम्ही शेपट्या घालून बसलाय

चिखली, (बुलढाणा) दि. २६ – औरंगाबाद जिल्ह्याचा मंत्री काय नाव त्याचं अब्दुल ..र. नाही मी मुद्दामहून बोलतोय. हे सोडून देण्याची वेळ नाही.  त्याने सुप्रिया सुळेंचा अपमान केला. ठिक आहे राजकारण म्हणून तुम्ही टीका करा. पण तुम्ही शिवी देता ? मी मुख्यमंत्री असतो तर कोणी जरी महिलेचा अपमान केला असता तर लाथ मारून घालून दिलं असतं. जसं मी एकाला घालून दिला होता. एका बाजुला महिलेचा अपमान होतोय. महिलेबद्दल अपशब्द वापरले. तरी गुळमुळ. तुम्ही काय वाघ आहात की गांडूळ आहात ? महाराष्ट्राचे उद्योग बाहेर जात आहे तरी तुम्ही शेपट्या घालून बसलाय, महाराष्ट्र तोडण्याची भाषा होतेय तरी तुम्ही शेपट्या घालून बसलाय महाराष्ट्रात महिलेचा अपमान होतोत तरीसुद्धा तुम्ही शेपट्या घालून बसलाय असा निशाणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून साधला.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी चिखली येथील शेतकरी मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आक्षेपार्ह विधान, रोजगार, कर्नाटकचे मुख्यमंत्री, गुजरातला पळवलेले उद्योग, महाराष्ट्राचे विभाजन आदींचा समाचार ठाकरेंनी घेतला. उद्धव ठाकरेंनी केलेले भाषण त्यांच्याच शब्दात येथे देत आहोत.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनी आणि मातांनो, अनेक महिन्यांनंतर वर्षांनंतर आपल्या दर्शनाला आलो आहे. दसरा मेळाव्यानंतरच आई जिजाऊंच्या जन्मस्थानी आशीर्वाद घेऊन सुरुवात करायची, म्हणून बुलढाण्यात आलो. आज शहीद दिन, संविधान दिन. परंतु ते संविधान आज सुरक्षीत आहे का?  काही दिवस अगोदर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत होतो. आज देशाची लोकशाही वाचवायची ही सगळ्यांची भावना. तेच बोलले आमचे रेडे. आज नवस फेडायला गेले परवा हात दाखवायला गेले होते. तुमच भविष्य तुम्हाला माहिती नाही आणि हे राज्य चालवणार. दिल्लीने म्हटले की उठायचे बस म्हटले की बसायचे.

काही जुने चेहरे दिसत नाहीत. नितिन देशमुख चांगला शिवसैनिक. ते परत आले.  आज सगळे काय झाडी काय डोंगर सगळे ओक्के. ते तिकडे आशीर्वाद घ्यायला गेले, मी जिजाऊंचे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. काही गेलेत, नितिन आहे, विनायक राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत. मी पुन्हा त्वेषाने उभा आहे.

कसे नेले इथल्या ताई मोठ्या हुशार थेट पंतप्रधानांना राखी बांधली फोटो छापून आणला. ही चालूगिरी लोक बघत नाहीएत. भाजप आज आयात पक्ष, भाकड पक्ष. यादी काढा मग समजेल किती आयात लोक आहेत. स्वतः चंद्रकांत पाटील बोलले. मनावर दगड ठेवला. आजही गद्दारांनी सांगावे आम्ही भाजपाच्या टिकिटावर लढणार नाही. बाळासाहेब हवेत, चिन्ह हवे मग तुमची मेहनत कुठे आहे?

छत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील. मिंधे गप्प बसतील. विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊ पणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला.

काल अमित शहा बोलले आम्ही धडा शिकवला. पण बाबरी पाडल्यावर शिवसेना उभी राहिली, अमरनाथ यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख उभे राहिले. आमच दैवताचा पुराने आदर्श म्हणून उल्लेख करतात. सत्तारने सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर लाथ घालून हाकलला असता. महाराष्ट्राचा अपमान होतोय, देवतांचा अपमान होतोय तुम्ही सहन करता हे असले बाळासाहेबांचे विचार नाहीत.

ज्योतिषाला हात दाखवता, आज शहीद दिवस आहे अन् हे नवस फेडायला गेले. शेतकऱ्यासाठी वेळ नाही. पीकविमा मिळाला तुम्हाला. (बुलढाण्यातला शेतकरी बांधवाचा उल्लेख) नागपूर अधिवेशनात मी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. (माध्यमांसमोर विचारले शेतकऱ्यांना) खोके सरकार गादीवर आले आणि पनवती सुरु झाली. कसला नवस फेडता आणि शेतकरी दुर्लक्षित. अन्नदाता शेतकरी विचारतो खायच काय?  पंतप्रधान म्हणतात मी दोन तीन किलो शिव्या खातो. तुमच ठिक आहे शिव्या खाऊन जगता पण शेतकऱ्यांचे काय? मागे मोर्चा काढला वठणीवर आले विमावाले आता पुन्हा आणावे लागेल.

डीपी जळते, बीड पॅटर्न मविआने आणला. (फडणवीसांचे जुने विधान ऐकवले.) देवेंद्र जनाची नाही मनाची लाज बाळगा. मी आव्हान देतो तुम्ही सत्तेत आहात ना वीजबिल माफ करा. वर वेगळी भाषा खालती उतरले की वेगळी भाषा. पश्चिम विदर्भाचा काही भाग राहिला हे मला माहिती आहे. अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले किती लोकांना मिळाले चॅनलवाल्यांनी हे दाखवावे. खोटे बोलून रेटून न्यायचे.

शिवसेना जिवंत सळसळत रक्त. कितीही फोडा तुम्हाला शक्य होणार नाही. मी तुमच्या भरवशावर आहे पण तुमच्या संकटात उभे राहण्यासाठी आलो आहे. आत्महत्या करायची नाही.

संजय राऊत सारखा मर्द तुरूंगात जाऊन आले तरी सोबत. हे सगळे गद्दार, तोतये. यांचे कर्तृत्व शून्य. एका व्हिडिओत मुख्यमंत्री शेतीत रमले. शेतातला दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री. चिखल तुडवत जाणारे शेतकरी,  कधीतरी डीपी जळते. हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जातो. तुम्ही ज्योतिष्याकडे जाता मग शेतकऱ्याने कुठे जायचे. तुमची सुबत्ता दाखवता मग शेतकरी उपाशी.

मी घरात बसूनही कामे केली त्याचे कौतुक कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा. पोळ्याला बैलाला सजवलेल्या पन्नास खोके. तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल. ह्या मिंधे सरकार कडून काही अपेक्षा नाही. नविन युवकशक्ती येत होती त्यांच्या मध्ये असणारे निघून गेले. आपण हिंदुत्वावरून कुणाला फसवले नाही. काश्मीर मध्ये भाजप मेहबूबा सोबत गेले तेव्हा काय होते? मी काँग्रेस राष्ट्रवादीला घेऊन धाराशिव आणि संभाजीनगर करून दाखवले. आम्ही काही सोडलेले नाही बोक्यांना खोक्यांची भूक म्हणून हे गद्दारी करुन गेले. काय कमी केले होत तुमच? या गोरगरिबांनी तुम्हाला निवडून गेले. आज तात्पुरता सत्ता पण देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायमची.

निवडणुक हारणे जिंकणे सोडून द्या केवळ स्वार्थासाठी गेलात. मनगटात ताकत किती असते हे शेतकऱ्यांनी केंद्राला दाखवून दिले. त्यांना अतिरेकी म्हटल्या गेले. तुमच्या नांगराची ताकद प्रचंड. आपल चिन्ह, नाव गोठवल पण मशाली पेटवल्या मन पेटवलय. आधी विमा कंपनीला नम्र विनंती करा. वीज बिल मुक्त करा आम्ही कर्ज मुक्त केला.

शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेल हाथ वर करुन सांगा कितीही संकटे आली तरी आत्महत्या करणार नाही. पदाधिकाऱ्यांना सांगतोय शेतकऱ्यांच्या साठी रस्त्यावर उतरा. केवळ हमीभाव नाही हक्काचा भाव हवा. गद्दारांना धडा शिकवायचा, महाराष्ट्राचा अपमान, महाराजांचा अपमान सहन करायचा नाही.

Back to top button
error: Content is protected !!