महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शरद पवार सहभागी होणार !

Story Highlights
  • या उपक्रमातून समाजात एकोपा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जेव्हा यात्रा राज्यात येईल तेव्हा विविध पक्षांचे काही नेते शक्य तिथे सामील होतील,

बारामती, 23 ऑक्टोबर -: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने समाजात एकोपा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याने ती महाराष्ट्रात दाखल झाल्यावर त्यात सहभागी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले.

पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रदेश काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी त्यांची भेट घेऊन भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला राज्यात आल्यावर त्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि 150 दिवसांत 3,570 किमी अंतर कापून जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचेल.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. आतापर्यंत ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांत पोहोचली आहे.

पवार म्हणाले, ही यात्रा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे. मात्र या उपक्रमातून समाजात एकोपा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जेव्हा यात्रा राज्यात येईल तेव्हा विविध पक्षांचे काही नेते शक्य तिथे सामील होतील,” असे ते म्हणाले.

दुसर्‍या प्रश्नाला उत्तर देताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडणुकीच्या आजूबाजूला फिरणार्या राजकारणाची खिल्ली उडवली.

ते म्हणाले, “काही क्षेत्रात राजकारण आणू नये. असे करणारे अज्ञानी आहेत. मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना गुजरातचे प्रतिनिधीत्व नरेंद्र मोदी, दिल्लीचे प्रतिनिधित्व अरुण जेटली आणि अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधी होते. खेळाडूंना सुविधा देणे हे आमचे काम आहे. आम्ही इतर गोष्टींबद्दल काळजी करत नाही.”

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याबाबत पवार म्हणाले, ते शेतकऱ्यांच्या भेटीला जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य आणि केंद्र सरकारसमोर ठेवाव्यात. शेतकऱ्यांना फायदा झाला तर ती चांगली गोष्ट आहे.

Back to top button
error: Content is protected !!