महाराष्ट्र
Trending

पुणे: ब्रेक फेल झाल्याने भरधाव ट्रकने 48 वाहनांना उडवले !

Story Highlights
  • अग्निशमन विभागाने या घटनेत किरकोळ नुकसान झालेल्या वाहनांसह किमान ४८ वाहनांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.

पुणे (महाराष्ट्र), 20 नोव्हेंबर – पुण्यातील मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील पुलाच्या उतारावर रविवारी सायंकाळी ट्रकचे नियंत्रण सुटल्याने 24 वाहनांचे नुकसान झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संशयास्पद ब्रेक फेल झाल्याने किंवा चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात नवले पुलावर झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या घटनेत 10 ते 15 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मात्र इतर सहा ते आठ जणांना दोन रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

पोलिस उपायुक्त (झोन-III) सुहेल शर्मा म्हणाले, “ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक रस्त्यावरील काही वाहनांना धडकला आणि या घटनेत ट्रकसह किमान 24 वाहनांचे नुकसान झाले.” त्यापैकी 22 वाहने कार, तर एक ऑटोरिक्षा होती. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही.

अपघातात नुकसान झालेली वाहने रस्त्यावरून हटवली. रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन विभागाने या घटनेत किरकोळ नुकसान झालेल्या वाहनांसह किमान ४८ वाहनांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!