महाविद्यालय स्तरावरही दीक्षांत सभारंभाचे आयोजन ! ज्येष्ठ नेते शरद पवार व नितीन गडकरींना डी लिट प्रदान करणार !!
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची माहिती, 62 व्या दीक्षांत समारंभाची जय्यत तयारी, 30 समित्यांची स्थापना
- कुलगुरु मा.डॉ.प्रमोद येवले म्हणाले, ’कोविड’मुळे दोन वर्ष दीक्षांत समारंभ होऊ शकला नाही. यंदाचा हा सोहळा अत्यंत दिमाखदार व नियोजनबध्द करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
- नाटयगृहात १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान हा सोहळा होणार आहे.
- संलग्नित महाविद्यालयात पदवी व पदव्यूत्तर पदवी प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयातच पदवी प्रदान करण्यात येईल. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर महाविद्यालयातील समारंभ होतील.
औरंगाबाद,दि.७: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील पदवी व पदव्यूत्तर पदव्यांचे वितरण संबधित महाविद्यालयात दीक्षात समारंभ घेऊन करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरु मा.डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ येत्या १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभूषण ’सुपर कॉम्प्युटर’चे जनक विजय भटकर (कुलपती नालंदा विद्यापीठ) यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट प्रदान करण्यात येणार आहे.
या संदर्भात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सोमवारी (दि.७) आढावा बैठक घेण्यात आली. कुलसचिव डॉ.भगवान साखळे, परीक्षा मंडळ संचालक डॉ.गणेश मंझा यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी कुलगुरु मा.डॉ.प्रमोद येवले म्हणाले, ’कोविड’मुळे दोन वर्ष दीक्षांत समारंभ होऊ शकला नाही. यंदाचा हा सोहळा अत्यंत दिमाखदार व नियोजनबध्द करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने विविध ३० समित्यांची स्थापना करुन तयारी सुरु आहे. या सोहळयास प्रमुख मान्यवरांसह सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २०२० ते २०२१ या वर्षांतील पदवीचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभापासून आजपर्यंत ५६५ जणांना पीएच.डी घोषित करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत पीएच.डी प्राप्त संशोधकांनी दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करण्यासाठी अर्ज करावयाचे आहेत. अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.वाल्मिक सरवदे यांच्यासह सर्व ३० समित्यांचे अध्यक्ष, सदस्य यांची उपस्थिती होती.
सोळयाचे थेट प्रक्षेपण
६२ व्या दीक्षांत सोहळयाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच युटयूबसह विविध समाज माध्यमांवर करण्यात येईल. नाटयगृहात १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान हा सोहळा होणार आहे. नाटयगृहाच्या बाहेर देखील मंडळ उभा करुन मोठया पडद्यावर हा सोहळा प्रक्षेपित करण्यात येईल. या काळात मुख्य प्रवेशद्वार, नाटयगृह, छत्रपती शिवराय व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात सुभाभिकरण व विद्यूत रोषणाई करण्यात येणार आहे, असेही मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले आहे.
महाविद्यालयात दीक्षांत समारंभ : संलग्नित महाविद्यालयात पदवी व पदव्यूत्तर पदवी प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयातच पदवी प्रदान करण्यात येईल. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर महाविद्यालयातील समारंभ होतील. तर विद्यापीठ मुख्य परिसरात पदवी, पदव्यूत्तर पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी व एम.फिल पदवीचे वितरण सभारंमाच्या दिवशी परीक्षा विभागातील काउंटरवर पदवी वितरण करण्यात येईल, अशी माहिती डॉ.गणेश मंझा यांनी दिली.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट