महाराष्ट्र
Trending

मराविमं अधिकारी संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे सरचिटणीस तथा महावितरण औरंगाबाद परिमंडल कार्यालयातील उपव्यवस्थापक (मानव संसाधन) संजय खाडे यांची नुकतीच व्यवस्थापकपदी लातूर परिमंडल कार्यालय येथे पदोन्नती झाली. त्या निमित्ताने एका खास समारंभात त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे,अधीक्षक अभियंता (शहर मंडळ) प्रकाश जमधडे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) संजय सरग, अधीक्षक अभियंता (स्थापत्य मंडळ) मोहन काळोखे, प्रादेशिक कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रवीण बागुल, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) कांचन राजवाडे, सहाय्यक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, लक्ष्मीकांत राजेल्ली, चेतन वाघ तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक गोंदावले व मुख्य अभियंता खंदारे, उपमहाव्यवस्थापक बागुल यांनी खाडे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खाडे यांनीसुद्धा चौफेर बॅटिंग करत निरोप समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांची मने जिंकली. नि:स्वार्थ भावनेने काम करत राहिल्यास व कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करत राहिल्यास निश्चितच यश मिळते, असे संजय खाडे म्हणाले.

यावेळी एसईएतर्फे अविनाश सानप, बालमुकुंद सोमवंशी, वर्कर्स फेडरेशनतर्फे पांडुरंग पठाडे, तांत्रिक कामगार युनियनतर्फे सय्यद जहिरोद्दिन, कामगार महासंघातर्फे अरुण पिवळ, बापू शिंदे, मागासवर्गीय संघटनेतर्फे विनय घनबहादूर, नाट्य संचातर्फे श्रावण कोळनूरकर, रमेश शिंदे, सुरेश कोंडके आणि इतर अनेक पदाधिकारी-सभासदांनी खाडे यांचा सत्कार करून त्यांच्या कार्यावर मनोगतातून प्रकाश टाकला.

समारंभ यशस्वी करण्यासाठी अधिकारी संघटनेचे उपसरचिटणीस प्रणेश शिरसाठ, परिमंडळ अध्यक्ष अक्षय पाडसवान, परिमंडळ सचिव नितीन पारिपेल्ली, प्रादेशिक सहसचिव सागर चव्हाण, डॉ.शिवाजी तिकांडे ,विश्वास पाटील, सुनील पावडे, स्वाती चव्हाण-गाडेकर, गणेश बोढरे,रमेश सोनवणे, दिलीप पवार, प्रदीपसिंह बायस, राहुल शंभरकर, रोहित ठाकूर, प्रकाश चांडगे आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमास विविध अधिकारी, कर्मचारी संघटनांचे जवळपास दीडशेहून अधिक प्रतिनिधी सत्कारमूर्ती संजय खाडे यांच्या प्रेमापोटी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!