महाराष्ट्र
Trending

प्रधानमंत्री आवास योजनेतील मुद्रांक शुल्क घटवले, आता द्या फक्त हजार रुपये मुद्रांक शुल्क !

मुंबई, दि. २९ – प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना १ हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क  आकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्याना होणार फायदा होणार आहे.

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ मधील कलम ९ च्या खंड अ मधील अधिकारांचा वापर करुन लोकहितास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी सदनिकांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तांना अटी व शर्थींच्या अधीन राहून हे मुद्रांक शुल्क निश्चित केलेले आहे.

Back to top button
error: Content is protected !!