माझ्या खूनाचं प्लॅनिंग झालं असतं तर काही वाटलं नसतं परंतु विनयभंगाचा गुन्हा दाखल करून खालचे राजकारण: आमदार जितेंद्र आव्हाड
समाजात माझी मान खाली जाईल अशापध्दतीचा गुन्हा नोंदवायचा हा षडयंत्राचा भाग: जितेंद्र आव्हाड
- मी मंत्री असताना माझ्या वागण्याची पद्धत सगळ्यांना माहित होती.
ठाणे, दि. 14 – माझ्यावर कुठलाही गुन्हा नोंदवला असता तरी चालले असते परंतु ३५४ हा गुन्हा मला मान्य नाही. आणि जो मी आयुष्यात केला नसल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज केला. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय दाखल केला असा सवाल उपस्थिक करून ते म्हणाले, तक्रारीत शब्द वापरले आहेत ते त्यापेक्षा व्हिडीओ क्लीअर आहे कोणते शब्द वापरले आहेत ते.
आमदार आव्हाड म्हणाले की, समाजात माझी मान खाली जाईल अशापध्दतीचा गुन्हा नोंदवायचा हा षडयंत्राचा भाग झाला. मी मंत्री असताना माझ्या वागण्याची पद्धत सगळ्यांना माहित होती. सरकार सगळ्यांचे असते. आमदारांमध्ये भेदभाव केला नाही. मला असेच पोलीस ठाण्यात नोटीस देत आहे म्हणून बोलावले. थोड्यावेळाने डीसीपी आले त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मी मुंबईत जातोय म्हटल्यावर तुम्हाला अटक करण्यात येत आहे असे सांगण्यात आले.
४१ अन्वये नोटीस दिल्यानंतर ७२ तास त्या व्यक्तीला द्यावे लागतात. त्या नोटीसमध्ये पाच वाजता चौकशीला हजर रहा सांगत आहेत. इंग्रजाच्या काळातील कलम लावून उपजीविकेच्या साधनात अडचण केली म्हणून मला अटक करण्यात आली.
आम्ही माफी मागणार नाही
आम्ही लढलो शिवाजी महाराजांसाठी आणि लढत राहू, त्यामुळे जेलमध्ये राहणे हे नवीन नाही. जेम्स लेन आला तिथपासून लढत आहे. आणि ही लढाई अविरत चालू राहील. पण पोलिसी बळाचा वापर कशासाठी त्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही. परंतु माझ्यावर ३५४ गुन्हा दाखल करता. माझ्या खुनाबद्दल प्लॅनिंग झाले असते तर काही वाटलं नसते परंतु ३५४ चा गुन्हा दाखल करता इतके खालचे राजकारण सुरु असल्याने त्यापेक्षा यात न राहिलेले चांगले असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट