महाराष्ट्र
Trending

वैजापूरच्या दोन दरोड्यांचे बीड कनेक्शन, धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा औरंगाबाद गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, गंगापूरचे दोघे जेरबंद !

औरंगाबाद, दि. 23 – पोलीस ठाणे विरगांव हद्यीत ०२ दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला. 2 दरोडेखोर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

तेज्या गोरख काळे (रा. हनतगांव चिखली ता. आष्टी जि. बीड) याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखे दोन साथीदाराची नावे सांगितली. त्यानुसार संतोष डिस्चार्ज उर्फ सूर्यभान काळे रा. अंतापूर गायरान ता. गंगापूर जि. औरंगाबाद) (२) रवि उर्फ रविंद्र मुबारक भोसले (रा. अंतापूर गायरान ता. गंगापूर जि. औरंगाबाद) या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भाऊसाहेब आसाराम गायकवाड (वय ३७ वर्षे व्यवसाय शेती रा. हमरापूर शिवार ता. वैजापूर जि. औरंगाबाद) यांनी दिनांक ०२/११/२०२२ रोजी पोलीस ठाणे विरगांव येथे फिर्याद दिली की, दिनांक ०२/११/२०२२ रोजी ०१:०० वाजेच्या दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या घरात झोपलेले होते.

त्यावेळी ०६ अनोळखी चोरटयांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून कोयता, चाकू, गज, लाकडी काठ्या व कुर्हाडीचा दांडा या हत्याराचा धाक दाखवला. जिवे मारण्याच्या धमक्या देवून फिर्यादीचे वडील, भाऊ, आई यांना मारहाण व जखमी केले. तसेच फिर्यादीच्या घराशेजारी कमलाबाई वाघ यांचेही घरात घुसून त्यांना हत्यारांचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १,३४,३००/- रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. त्यावरुन पोलीस ठाणे विरगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच शेषराव माधव चौधरी (वय ४१ वर्षे व्यवसाय शेती रा हमरापुर शिवार ता. वैजापूर जि. औरंगाबाद) यांनी दिनांक ०२/११/२०२२ रोजी पोलीस ठाणे विरगांव येथे फिर्याद दिली की, दिनांक ०२/११/२०२२ रोजी ०२:३० वा.च्या दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या घरात झोपलेले होते. त्यावेळी ०७ अनोळखी चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून कोयता, चाकू, गज, लाकडी काठ्या व कुन्हाडीचा दांडा या हत्याराचा धाक दाखवला. जिवे मारण्याच्या धमक्या देवून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण ४४,३००/- रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. यावरून पोलीस ठाणे विरगांव येथे गुन्हा दाखल झालेला आहे.

या दोन्ही गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक व तांत्रीक विश्लेषणा आधारे माहिती मिळाली की, सदरच्या गुन्हयातील निष्पन्न आरोपी तेज्या गोरख काळे (रा. हनतगांव चिखली ता. आष्टी जि. बीड) हा सदर गुन्हयांत दिनांक ०९/११ / २०२२ रोजी निष्पन्न झाल्याने व सदर गुन्ह्यात त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले.

त्याने सदर गुन्हयाची कबुली देऊन गुन्हा करताना साथीदार (१) संतोष डिस्चार्ज उर्फ सूर्यभान काळे (रा. अंतापूर गायरान ता. गंगापूर जि. औरंगाबाद), (२) रवि उर्फ रविंद्र मुबारक भोसले (रा. अंतापूर गायरान ता. गंगापूर जि. औरंगाबाद) व इतर चार साथीदारांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीतांचा गंगापूर हद्दीत शोध घेत असतांना सदर गुन्हयांतील निष्पन्न आरोपी (१) संतोष डिस्चार्ज उर्फ सूर्यभान काळे रा. अंतापूर गायरान ता. गंगापूर जि. औरंगाबाद) (२) रवि उर्फ रविंद्र मुबारक भोसले (रा. अंतापूर गायरान ता. गंगापूर जि. औरंगाबाद) हे मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी देखील वरिल गुन्हयाची कबुली दिली. आरोपींना सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे विरगांव यांच्या ताब्यात देण्यांत आले असून पुढील तपास पोलीस ठाणे विरगांव हे करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहा. पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि विजय जाधव, पोहेकॉ श्रीमंत भालेराव, नामदेव शिरसाठ, संतोष पाटील, पोना वाल्मीक निकम, विजय धुमाळ, उमेश बकले, पोकों रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, राहूल गायकवाड, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!