महाराष्ट्र
Trending

वीजबील भरा बक्षीस मिळवा योजनेचे विजेते भालेराव कुटूंबियांना महावितरणतर्फे एलईडी टीव्ही !

Story Highlights
  • वीजबिलांसाठी ठराविक रक्कम इतर खर्चातून वेगळी काढून ठेवत नियोजन केल्यानेच मुदतीच्या आत वीजबील भरणे शक्य

नांदेड, दि.21 ऑक्टोबर 2022: मराठवाड्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेल्या बक्षीस योजनेतील जूलै महिन्याची सोडत नुकतीच काढण्यात आली. त्यात परिमंडल स्तरावरचे एलईडी टीव्हीचे बक्षीस पावडेवाडी शाखा कार्यालया अंतर्गत येणाऱ्या पुष्पनगरी येथील वीजग्राहक कमलाकर भालेराव यांना जाहीर झाले. महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या हस्ते भालेराव कूटुंबीयांना घरी जाऊन एलईडी टीव्ही सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

घरगुती ग्राहकांना दर महिन्याला वेळेवर वीजबिल भरण्याची सवय लागावी या उद्देशाने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून अभिनव बक्षीस योजना सुरू केलेली आहे. जुलै महिन्याच्या सोडतीत परिमंडल पातळीवरील एलईडी टीव्हीचे बक्षीस नांदेड शहर उपविभाग दोन व पावडेवाडी शाखा अंतर्गत येणाऱ्या पुष्पनगरी येथील रहिवाशी कमलाकर गोविंदराव भालेराव यांना जाहीर झाले.

महावितरणच्या नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, शहर विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण यांच्या हस्ते भालेराव कूटुंबास हे बक्षीस घरी जाऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी शहर उपविभाग दोनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेश औरादे, सहायक अभियंता भुऱ्हे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री रामगीरवार तसेच लेखा विभागाचे उप व्यवस्थापक राजेश आरेकर व जनमित्र उपस्थित होते.

याप्रसंगी भालेराव कुटूंबियांनी बक्षीस मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत महावितरणचे आभार मानले. वीजबिलांसाठी ठराविक रक्कम इतर खर्चातून वेगळी काढून ठेवत नियोजन केल्यानेच आम्हाला मुदतीच्या आत वीजबील भरणे शक्य झाल्याचे सांगितले. महावितरणने घरबसल्या वीजबील भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

त्यामुळे बील भरणे अधीकच सोपे झाले आहे. इतर गरजे प्रमाणेच वीज महत्वाची असून वीजग्राहकांनी आपली बिले वेळेवर भरण्याचे आवाहन भालेराव कुटूंबियांनी केले. त्याचबरोबर सर्व घरगुती वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत आपली वीजबिले वेळेवर भरण्याचे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी याप्रसंगी केले.

Back to top button
error: Content is protected !!