राष्ट्रीय
Trending

जेव्हा तुम्ही बेरोजगारीवर प्रश्न विचाराल तेव्हा प्रधानमंत्री मोदी म्हणतील, भाइयों और बहनों चाय पी लो। ओवेसींचा हल्लाबोल

जयपूर, 15 सप्टेंबर – एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी केंद्राच्या धोरणांवर सडकून टीका केली आणि म्हटले की लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी प्रत्येक मुद्द्याला वळचणी दिली जात आहे.

ओवेसी म्हणाले की, “जगात भारतामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, पण जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रश्न विचाराल तेव्हा मोदी म्हणतील, भाइयों-बहनों चाय पी लो। महागाई आटोक्यात का येत नाही असे विचारल्यावर ते म्हणतील आम्ही राम मंदिर बांधले नाही का.”

ओवेसी दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असताना नागौर जिल्ह्यातील लाडनून येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. पुढील वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

ओवेसी म्हणाले की, भाजपने काय दिले आणि काय काढून घेतले याचा विचार तरुणांनी करण्याची गरज आहे.

Back to top button
error: Content is protected !!