महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविका, सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त शिक्षक, माजी सैनिकांना संधी ! औरंगाबाद डाक विभागात विमा एजंट पदासाठी मुलाखत !!

औरंगाबाद  :  औरंगाबाद डाक विभागात डाक जीवन विमा, ग्रामीण डाक जीवन विमा एजंट थेट मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक पात्रता निकष वयोमर्यादा- 18 ते 50 वर्षे, शैक्षणिक पात्रता अर्जदार हा किमान 10 वी उत्तीर्ण अथवा केंद्र व राज्य सरकार मान्यताप्राप्त समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार, इतर विमा कंपन्याचे माजी अभिकर्ते, स्वयंरोजगार वा उपरोक्त पात्रता असलेले इच्छुक, उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

            व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विम्या बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती इत्यादी बाबी आवश्यक. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपये ची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक आहे.

जी कि राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र स्वरुपात असेल, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल, जो IRDA ची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवान्यामध्ये रुपांतरित केला जाईल.

            सर्व इच्छुकांनी अधीक्षक, डाकघर, औरंगाबाद विभाग, जुना बाजार, औरंगाबाद 431001 यांचे कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्राची एक साक्षांकीत प्रत आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र नमुन्यातील अर्जासह दि.9 डिसेंबर 22 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

तसेच नियुक्ती ही लायसन्स तसेच कमिशन तत्वावर असेल. असे आवाहन औरंगाबाद विभाग अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

Back to top button
error: Content is protected !!