करंजखेड ग्रामरक्षक दलातील युवकांच्या पाठीवर पोलीस अधीक्षकांकडून कौतुकाची थाप ! पाचोड, पैठण, बिडकीन, वडोदबाजार, खुलताबाद, अजिंठा पोलिस ठाण्याचाही गौरव !!
औरंगाबाद, दि. 22 – पोलीस अधीक्षक कार्यालय, येथे मासिक गुन्हे आढावा बैठकीच्या दरम्यान मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयातील पोलीस ठाणे पिशोर हद्यीतील करंजखेड येथील ग्रामरक्षक दलांचे युवकांनी केलेल्या कामगिरीबाबत त्यांची प्रशंसा करुन त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला. आज दिनांक 22/9/2022 रोजी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
या ग्रामरक्षक दलाचे युवकांनी पोळयाचे पुर्व संध्येला दिनांक 26/8/2022 रोज रात्रीचे 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास गावात पायी गस्त घालत असतांना त्यांना एक वाहन येतांना दिसले त्यांना त्यास थांबण्याचा इशारा केला परंतु वाहनचालकाने वाहन सुसाट पळवले यावरून त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पिशोर पोलीस स्टेशनला गाडीच्या वर्णनाची माहिती दिली. पोलीसांना तलवाडीफाटा रोडवर ते वाहन अडवण्यात यश आले.
त्यामध्ये दोन बैल व एक गाय चोरी करून नेत असल्याचे समजले. यातील जनावरे उमरखेड, गोकुळवाडी, खातखेड या भागातील शेतवस्तीवर शेतक-याला मारहाण करून बळजबरीने घेऊन गेल्याचे (दरोडा टाकून) निष्पन्न झाले होते. ग्रामरक्षक दलाचे युवकांचे सर्तकतेमुळे त्यांचे परिसरातील शेतक-यांची मारहाण करून बळजबरीने घेऊन गेलेली जनावरे ही त्यांना परत मिळण्यास मदत होऊन यातील पाच आरोपीतांना पकडण्यात पोलीसांना यश आले होते.
यामध्ये करंजखेड येथील ग्रामरक्षक दलाचे युवकामध्ये शेख इमरान मोहमंद, 2) शेख रहिम जिलानी 3) शेख रमजान रफिक 4) खलिल सलीम शेख 5) रियाज खान सिराज खान (सर्व रा. करंजखेडा) यांचा पोलीस अधीक्षक यांनी प्रशंसा करून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. ही बाब इतरही ग्रामरक्षक दलांचे युवकांना निश्चितच प्रोत्साहन व स्फूर्ती देईल.
तसेच यातील आरोपीतांना जेरबंद करणा-या पिशोर ठाण्याचे सपोनि कोमल शिंदे, पो.उप.नि. विजय आहेर, पो.उप.नि. सतिष बढे, पोलीस अंमलदार गजानन क-हाळे, सोपान डकले, लालचंद नागलोद, सतीष देसाई, कौतीक सपकाळ, यांचा सुध्दा प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे.
तसेच जिल्हयातील गुंतागुंतीचे व क्लिष्ट अशा गुन्हयांचा सचोटीने व शास्त्रशुध्द तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याचप्रमाणे गोपनीय बातमीदार नेमून गुन्हयांची यशस्वी व उत्कृष्टपणे उकल करून आरोपी निष्पन्न करुन जेरबंद करणारे तपास अधिकारी व अंमलदार यांना प्रशंसापत्र देऊन त्यांच्या कौशल्ययुक्त तपासाचा गौरव करून त्यांचे पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
यामध्ये स्था.गु.शाने पोलीस ठाणे पाचोड व पैठण येथील दरोडयाचा गुन्हा तसेच पोलीस ठाणे खुलताबाद येथील बनावाट नोटा संबधी गुन्हे उघडकीस आणुन आरोपी अटक केले होते या कामगिरी मध्ये स्थागुशा चे पोनि रामेश्वर रेंगे, पो.उप.नि. प्रदिप ठुबे, विजय जाधव, पोलीस अंमलदार श्रीमंत भालेराव, लहु थोटे, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमळे, समावेश होतो.
पोलीस ठाणे बिडकीन येथील दरोडयाचा व पोलीस ठाणे वडोदबाजार येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी जेरबंद करण्याची कामगिरी बाबत पो.स्टे. बिडकीन येथील पो.उप.नि. महेश घुगे, पोलीस अंमलदार शरद पवार यांनी केली होती.
पोलीस ठाणे अजिंठा अंतर्गत अजिंठा बँकेत चोरी करण्याचे प्रयत्नात असलेला आरोपी हा सायरन वाजल्यामुळे पळून गेला असात तो अज्ञात आरोपी निष्पन्न करून त्याला अटक केली या कामगिरी बाबत सपोनि अजित विसपुते अंमलदार ए.व्ही. गाडेकर.
पोलीस ठाणे करमाड येथील पाईप चोरीचा गुन्हयाचा उलगडा करून 55000/- रुपयांचे पाईप चोरी करणा-या आरोपीला जेरबंद करण्याची कारवाई पोलीस अंमलदार व्हि.जी. चव्हाण व एस.डी. लहाने यांनी केली आहे.
वरील प्रमाणे उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी करून व गंभीर स्वरूपाचे गुन्हयांत आरोपीतांना अटक केल्या बद्दल ,पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा मा. मनिष कलवानिया,पोलीस अधीक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण यांनी प्रशस्ती पत्रक देवून अभिनंदन केलं.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट