महाराष्ट्र
Trending

तांत्रिक बिघाडामुळे लोकल ट्रेनची सेवा प्रभावित, रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी !

मुंबई, 22 सप्टेंबर – मुंबईतील मध्य रेल्वेच्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गुरुवारी सकाळी लोकल ट्रेन सेवा प्रभावित झाली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

प्रवाशांनी सांगितले की, काही मार्गावरील काही गाड्याही रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सकाळी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती.

सकाळी सहाच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकावर ‘सिग्नल’ पाठवणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, “सकाळी 6 वाजल्यापासून मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा उशिराने सुरू आहेत,” ते म्हणाले, तांत्रिक बिघाड सकाळी 8.30 च्या सुमारास दुरुस्त करण्यात आला.

मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून दररोज सुमारे 40 लाख लोक प्रवास करतात.

Back to top button
error: Content is protected !!