बॉलिवूडमहाराष्ट्र
Trending

मुंबई हॉटेलच्या खोलीत मॉडेलच्या आत्महत्येने खळबळ ! सुसाइड नोट- मी आनंदी नाही, मला शांतता हवी आहे !

मुंबई, ३० सप्टेंबर – अंधेरीच्या वर्सोवा उपनगरातील एका हॉटेलच्या खोलीत एका ३० वर्षीय मॉडेल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.

एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. आकांक्षा मोहन असे मृत मॉडेलचे नाव असून बुधवारी मृतदेह बाहेर काढण्यात आला. ते म्हणाले की, ‘आनंदी नाही’ आणि ‘शांती’ हवी आहे, असे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले असल्याने नैराश्येतून तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे.

वर्सोवा पोलिस स्टेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “हॉटेलच्या व्यवस्थापकाने पोलिसांना कळवले की हॉटेलच्या खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतरही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कामासाठी धडपडणारी ही मॉडेल मुंबईतील लोखंडवाला भागातील यमुना नगर सोसायटीत राहात होती आणि बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ती हॉटेलमध्ये आली आणि तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले.

माहिती मिळताच पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये पोहोचले आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेथे त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

अधिकारी म्हणाले की, घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली असून त्यावर लिहिले आहे, ”मला माफ करा. या घटनेला कोणीही जबाबदार नाही. मी आनंदी नाही मला शांतता हवी आहे.”

ते म्हणाले की, या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!