महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

मुकेश अंबानींच्या कुटुंबीयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बिहारमधून एकाला ताब्यात घेतले !

मुंबई, ६ ऑक्टोबर – उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बिहारमधील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, पोलिसांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री दरभंगा जिल्ह्यातून एका संशयिताला पकडून मुंबईत आणले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दोनदा फोन करून रुग्णालय आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे ‘अँटिलिया’ हे घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.

त्यांनी सांगितले की, फोन करणाऱ्याने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

Back to top button
error: Content is protected !!