राष्ट्रीय
Trending

पोलिस लाईनच्या आवारात दारू पिऊन भांडण केल्याप्रकरणी 2 कॉन्स्टेबल तडकाफडकी निलंबित !

मथुरा (उत्तर प्रदेश), ६ ऑक्टोबर – मथुरा जिल्ह्यातील पोलीस लाइन्स परिसरात दारूच्या नशेत झालेल्या भांडणप्रकरणी दोन कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस प्रवक्त्याने गुरुवारी माहिती दिली की, 3 ऑक्टोबर रोजी पोलीस लाईनमध्ये तैनात कॉन्स्टेबल संजीव कुमार भदौरिया आणि राजेश कुमार यादव यांच्यात मारामारी झाली होती आणि त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत होते.

त्यांनी सांगितले की, वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) अभिषेक यादव यांनी पोलीस अधिकारी (सीओ) गुंजन सिंग यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सीओने बुधवारी आपला अहवाल एसएसपींना सादर केला.

प्रवक्त्याने सांगितले की, शिस्तभंगाची कारवाई करत वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दोन्ही कॉन्स्टेबल तडकाफडकी निलंबित केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!