राष्ट्रीय
Trending

भगवान जगन्नाथाची 60 हजार एकरहून अधिक जमिनीची कागदपत्रे होणार डिजिटल ! महाराष्ट्रातही 28.21 एकर जमीन !!

पुरी, 28 सप्टेंबर – ओडिशा सरकारच्या मान्यतेनंतर भगवान जगन्नाथ यांच्या नावावर असलेल्या 60 हजार एकरहून अधिक जमिनीची कागदपत्रे डिजिटल केली जाणार आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

पुरीचे गजपती महाराज दिव्या सिंह देव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे (एसजेटीए) मुख्य प्रशासक व्ही.व्ही. यादव यांनी सांगितले की, ओडिशात महाप्रभू जगन्नाथ बीजे यांच्या नावावर 60,426 एकर जमीन आहे आणि इतर सहा राज्यांमध्ये 395.252 एकर जमीन आहे.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ओडिशाच्या बाहेर पश्चिम बंगालमध्ये देवाच्या नावावर सर्वाधिक ३२२.९३० एकर जमीन आहे. याशिवाय महाराष्ट्रात २८.२१ एकर, मध्य प्रदेशात २५.११ एकर, आंध्र प्रदेशात १७.०२ एकर, छत्तीसगडमध्ये १.७ एकर आणि बिहारमध्ये ०.२७ एकर क्षेत्र आहे.

यादव म्हणाले की, जमिनीच्या दस्तऐवजांच्या डिजिटायझेशनची जबाबदारी ओडिशा स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (ORSAC) या सरकारी संस्थेला दिली जाईल. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यांनी मंगळवारी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!