महाराष्ट्र

महावितरणची धडक कारवाई, पाच वीजचोरांवर गुन्हा दाखल !

औरंगाबाद : मीटरमध्ये फेरफार तसेच आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्या पाच जणांवर महावितरणने सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे सहायक अभियंता श्याम मोरे, त्यांचे सहकारी सुधीर गाढे, संजय साबळे, नागराज खिल्लारे, आकाश दणके, गोरठे व इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पथकाने गत ऑगस्ट महिन्यात विविध वीजजोडण्यांची तपासणी केली.

त्यात मिसारवाडी येथे राहणाऱ्या विलास गुलाबराव बोर्डे याने मीटरला येणाऱ्या सर्व्हिस वायरला टॅपिंग केल्याचे आढळले. त्याने ७९० युनिट्सची १५ हजार ३१९ रुपयांची वीजचोरी केली. शेख जुलेखाबी सादेक शेख या ग्राहकाने १०९२ युनिट्सची ११ हजार ७७२ रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले.

संदीप बाबुलाल मोटे याने २००२ युनिट्सची ३० हजार २०१ रुपयांची वीजचोरी केली. भाड्याच्या घरात राहणाऱ्या सुभाष खरसान याने अधिकृत वीजजोडणी न घेता आकडा टाकून वीज वापरली.

त्याने १२९६ युनिट्सची २२ हजार ३८६ रुपयांची वीजचोरी केली. चिकलठाणा एमआयडीसीत पावरलूम रोडवर शिवाजी बन्सी शिंदे यानेही सर्व्हिस वायरला टॅपिंग केल्याचे आढळले. त्याने ३५५१ युनिट्सची ५७ हजार ९८९ रुपयांची वीजचोरी केली.

या पाचही जणांवर सहायक अभियंता श्याम मोरे यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!