महाराष्ट्र
Trending

मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा, रोजगाराच्या 7 हजार संधी ! अप्रेंटीसशिपची संधीही उपलब्ध !!

नोकरी इच्छुकांनी सहभागी होण्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

मुंबईदि. 1 : कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चे आयोजन शनिवारी 3 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.

सकाळी 10 वाजेपासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल3 महापालिका मार्गधोबी तलावछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरियाफोर्टमुंबई येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील 7 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, नोकरी इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावाअसे आवाहन कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन मंत्री श्री. लोढामुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरकौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन.मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.

मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि.आयसीजेस्पॉटलाईटस्मार्ट स्टार्टबझ वोर्कटीएनएस इंटरप्रायझेसयुवाशक्तीइम्पेरेटीव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. दहावीबारावीपदवीधरआयटीआयपॉलिटेक्नीकइंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंगआयटीआयएसटुरिझमहॉस्पीटीलिटीएचआर अॅप्रेंटीसशीपडोमॅस्टिक वर्करइलेक्ट्रॉनिक्समॅनेजमेंट तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण ७ हजार पदे उपलब्ध आहेत.

अप्रेंटीसशिपची संधीही उपलब्ध

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उर्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत.

मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून, यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळमौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणा-या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही उमेदवारांना या मेळाव्यात घेता येणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!