महाराष्ट्र
Trending

विद्युत उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, तीन कामगार ठार, आठ जखमी !

पालघर जिल्ह्यातील वसई औद्योगिक युनिटमधील घटना

पालघर, 28 सप्टेंबर – महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथील एका औद्योगिक युनिटमध्ये बुधवारी हायड्रोजन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, चंद्रपारा परिसरात असलेल्या विद्युत उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

ते म्हणाले की, गंभीर भाजल्याने मृत कामगारांची ओळख पटू शकली नाही.

Back to top button
error: Content is protected !!