महाराष्ट्र
Trending

जुनी पेन्शन, 20 पटांच्या शाळा, मुख्यालयी राहण्याची सक्ती नको व रिक्त पदांसाठी शिक्षकांचे आझाद मैदानावर 1 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन !

विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधणार

औरंगाबाद, दि. 10 -: महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने येत्या १ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करून राज्य सरकारचे  विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहेत.

यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना सुरू करणे, २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, मुख्यालय सक्ती करण्यात येऊ नये, राज्यातील उप शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख , पदवीधर शिक्षक, प्रशाला मधील वर्ग २ मुख्याध्यापक रिक्त पदे भरणे,  सर्व अशैक्षणिक कामे ,व अवाजवी उपक्रम टपाल कामे बंद करणे, डीएड बीएड धारक यांची भरती करून राज्यातील प्राथमिक शिक्षक रिक्त पदे भरणे, वस्ती शाळा शिक्षक यांची मूळसेवा ग्राह्य धरणे, शिक्षक मतदार संघात प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क देणे, आश्वासित योजना सुरू करणे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना खाजगी शाळा शिक्षकांप्रमाणे रजा रोखीकरण लाभ मिळणे, आदीसह विविध प्रकारच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मागील दोन अडीच दशके प्रश्नांबाबत शासन स्तरावरून संघटनांची आश्वासन देऊन सरकार व प्रशासन बोळवण करीत आलेले आहे, आतापर्यंत न्याय हक्काच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक सरकार कडून दुर्लक्ष होत आलेले आहे ,  शिक्षकांना न्याय मिळत नसल्याने  त्यात विविध प्रकारचे वादग्रस्त विषय यामध्ये  मुख्यालय  सक्ती, अनेक अशैक्षणिक आणि टपाल कामे, जिल्ह्यातील शेकडो शिक्षकाची रिक्त पदे याचा परिणाम  सरकारी शाळेवर होत आहे.

गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांच्या पाल्याच्या शिक्षणावर विपरीत परिणाम  होत आहे. सरकारने लक्ष केंद्रित करून प्राधान्याने राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवावे यासाठी सरकार चे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यातील शिक्षकांनी आंदोलनात  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आदर्श शिक्षक समितीच्या वतीने संस्थापक दिलीप ढाकणे, राज्य सचिव अंजुम पठाण, दीपा देशपांडे, पुष्पा दौड, राजेंद्र नवले,  के सी गाडेकर, जिल्हा अध्यक्ष संतोष पा बरबंडे, किशोर बिडवे, बबिता नरवटे, अलका झरवाल,  पद्मा वायकोस,  चेंअ र मन सुनंदा कुंभार, योगीता गोरे, सुरेखा पाथरीकर, भारती सोळुंके, वैशाली काजे, जयश्री दहीफळे,  किशोर पवार, शिवाजी एरंडे, संजीव देवरे , बाबूलाल राठोड, नजीर  शेख, ज्ञानेश्वर पठाडे, राजेश आचारी, राजेंद्र ढमाले, शांताराम तोरणंमल, बाबासाहेब सांगळे, राजू बाविस्कर , मनोहर।लबडे, संजीव गायकवाड, भरत सदभावे, संतोष कवडे , नाना शिंदे आदींने केले आहे

Back to top button
error: Content is protected !!