महाराष्ट्र
Trending

शाळांमधील सरस्वतीच्या फोटोवरून ओबीसी नेते भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला ! नाशिकच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली !!

मुंबई/नाशिक, 28 सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये सरस्वती देवीचा फोटो असल्याबद्दल सरकारला सवाल उपस्थित केला होता. दरम्यान, भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. सरस्वती ही विद्येची देवी असल्याने फोटो हटवल्या जाणार नाही, अशी भूमीका त्यांनी घेतली.

या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान भुजबळ म्हणाले होते की, शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, भाऊराव पाटील, डॉ. आंबेडकर यांची फोटो लावावेत.

माजी मंत्री भूजबळ म्हणाले होते की, या समाजसुधारकांऐवजी शाळांमध्ये सरस्वती आणि शारदा देवीच्या फोटो लावले जातात. आम्ही त्यांना पाहिले नाही आणि त्यांनी आम्हाला काहीही शिकवले नाही. आपण त्यांच्यापुढे प्रार्थना का करावी?”

शाळांमधून सरस्वतीचे फोटो हटवले जाणार नाहीत, अशी कडक भूमीका शिंदे आणि फडणवीस यांनी घेतली.

ओबीसी नेते भुजबळ यांचा गृह मतदारसंघ असलेल्या नाशिक येथे मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
“कोणताही फोटो हटवला जाणार नाही. काही लोकांना (भुजबळ) हवे ते वाटू शकते. त्यांच्या इच्छेनुसार आम्ही काम करणार नाही. सर्वसामान्यांना जे हवे आहे ते आम्ही करू.”

उपमुख्यमंत्री म्हणाले की, शाळांमध्येही समाजसुधारकांचे फोटो लावल्या जातील, मात्र सरस्वतीचा फोटो हटवला जाणार नाही.

ते म्हणाले, सरस्वती ही विद्येची देवी आहे. ज्यांचा आमची संस्कृती आणि हिंदुत्वावर विश्वास नाही ते अशी टिप्पणी करतात.

दरम्यान, भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!