महाराष्ट्र
Trending

नाशिकमध्ये स्लीपर कोच बसला भीषण अपघात ! आग लागून 10 जणांचा होरपळून मृत्यू, 24 जखमी !!

ट्रकला धडकून बसला आग, 10 ठार, 24 जखमी

मुंबई, 8 ऑक्टोबर – महाराष्ट्रातील नाशिक शहरात शनिवारी पहाटे एका बसला ट्रकने धडक दिल्याने आग लागली. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, औरंगाबाद रोडवर पहाटे पाचच्या सुमारास बसने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘स्लीपर’ कोच असलेल्या या खासगी बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते. ते म्हणाले की, नांदूर नाक्यावर बसने ट्रकला धडक दिली आणि काही मिनिटांतच आग लागली.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते म्हणाले की, मृत आणि जखमींमध्ये बसमधील बहुतांश प्रवासी आहेत. हा ट्रक धुळ्याहून मुंबईकडे जात होता.

Back to top button
error: Content is protected !!